शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

जेव्हा राहुल गांधींना राग येतो; सेल्फे घेणाऱ्या काँग्रेस नेत्याचा हात झटकला, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 2:52 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' बुधवारी सकाळी राजस्थानमधून हरियाणात दाखल झाली.

Bharat Jodo Yatra:काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुधवारी सकाळी राजस्थानमधून हरियाणात दाखल झाली. यावेळी फ्लॅग एक्सचेंज सोहळ्यात राहुल गांधी संतापले. राहुलचा राग पाहून सहकारी नेतेही आश्चर्यचकित झाले होते. कार्यक्रमादरम्यान स्टेजवर एक नेता सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र राहुल गांधींनी रागाने हात झटकला आणि फोन काढून घेतला. राहुल का संतापले, हे समजू शकले नाही.

सहकारी नेत्यांचे कौतुकयावेळी राहुल गांधींनी आपल्या सहकारी नेत्यांचे कौतुक केले. राहुल म्हणाले, 'मला आनंद आहे की, राजस्थानचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, सर्व मंत्री आणि नेत्यांनी महिन्यातून किमान एकदा 15 किलोमीटर चालण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचे म्हणणे ऐकून ते काम करणार आहेत. मी खर्गेजींना सांगेल की, जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आहे, तिथे आपल्या मंत्र्यांना-नेत्यांना महिन्यातून किमान एक दिवस या रस्त्यांवर चालून जनतेच्या समस्या सोडवण्यास सांगावे.

भाजपवर बोचरी टीकाराहुल पुढे म्हणाले की, या प्रवासात खूप काही शिकायला मिळत आहे. प्रवासात आपण लांबलचक भाषणे देत नाही. सहा वाजता प्रवास सुरू होतो, आम्ही सहा ते सात तास चालतो आणि नंतर 15 मिनिटांचे भाषण देतो. आजकाल नेता आणि जनता यांच्यात दरी निर्माण झाली आहे. जनतेचे ऐकण्याची गरज नाही, असे नेत्यांना वाटते. तासन्तास लांबलचक भाषणे देतात. आम्ही फक्त बोलत नाही, तर जनतेचे म्हणणे ऐकतो. 

मालखेडा सभेच्या चर्चेचा पुनरुच्चार करत राहुल म्हणाले की, भाजप नेत्यांनी विचारले की यात्रेची गरज काय? तर आम्ही द्वेषाच्या जगात प्रेम पसरवत आहोत. जेव्हा जेव्हा हे लोक या देशात द्वेष पसरवायला जातात तेव्हा आपल्या विचारसरणीचे लोक प्रेम पसरवायला लागतात. हा लढा नवीन नाही, हा लढा हजारो वर्षे जुना आहे. यामध्ये दोन विचारधारा कार्यरत आहेत. एक विचारधारा जी निवडकपणे लोकांना फायदेशीर ठरते आणि दुसरी विचारधारा म्हणजे लोकांचा आवाज. तो शेतकरी, मजुराचा आवाज आहे, त्याची विचारधारा आहे., अशी टीकाही राहुल यांनी केली.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस