Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये दाखल झाली. राहुल गांधी यांनी आज(मंगळवार) अमृतसर येथील श्री हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी राहुल गांधींनी भगव्या रंगाची पगडी घातली होती. राहुल यांचे सुवर्ण मंदिरातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, राहुल यांनी सुवर्ण मंदिराला भेट दिल्यानंतर भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करत काँग्रेस, राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला. मालवीय यांनी गांधी कुटुंबाला शीखविरोधी म्हटले आणि 1984 च्या शीख दंगलीसाठी राजीव गांधी आणि काँग्रेसला जबाबदार धरत राजीव गांधींच्या भाषणाचा जुना व्हिडिओही पोस्ट केला.
राहुल गांधींची सुवर्ण मंदिराला भेटराहुल गांधी यांनी मंगळवारी अमृतसर येथील श्री हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) येथे दर्शन घेतले. यावेळी राहुल गांधी भगव्या पगडीमध्ये दिसले, त्यांनी काही वेळ कीर्तनात बसून गुरुवाणी ऐकली. ब्लू स्टार ऑपरेशननंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील व्यक्ती सुवर्ण मंदिरात कीर्तन ऐकण्यासाठी बसली आहे. सुमारे 20 मिनिटे राहुल गांधी कीर्तन ऐकले. काँग्रेसची भारत जोड यात्रा हरियाणातील शंभू सीमेवरुन पंजाबमध्ये दाखल झाली. विशेष म्हणजे मंगळवारी सकाळपर्यंत राहुल गांधी अमृतसरमध्ये पोहोचल्याची माहिती कोणालाही नव्हती. राहुल गांधी कारने चंदीगडला पोहोचले, त्यानंतर ते विशेष विमानाने अमृतसरला गेले.
अमित मालवीय यांचे आजचे ट्विटराहुल गांधींच्या सुवर्ण मंदिर भेटीची छायाचित्रे ट्विटरवर पोस्ट होताच, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधींवर निशाणा साधला. या व्हिडिओमध्ये खुद्द राजीव गांधींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीचा उल्लेख केला आहे. राजीव गांधी म्हणाले होते की, 'मोठे झाड पडल्यावर पृथ्वी हलत नसते'. अमित मालवीय यांनी त्यासोबत लिहिले की, 'तुम्ही तुमचे वडील राजीव गांधी यांच्या शिखांच्या नरसंहाराचे समर्थन करणाऱ्या टिप्पणीचे प्रायश्चित केले आहे का? काँग्रेस रस्त्यावर उतरली, 'खून का बदला खून से लेंगे'च्या घोषणा दिल्या, महिलांवर बलात्कार केला, पुरुषांच्या गळ्यात जळते टायर टाकले...' या ट्विटमध्ये कमलनाथ आणि टायटलर यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
भाजपने यापूर्वीही शीखविरोधी दंगलीचा मुद्दा बनवला आहेकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजाबमधील लिंचिंगबाबत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले. मालवीय म्हणाले होते की, राजीव गांधी हे मॉब लिंचिंगचे जनक होते, त्यांनी शीखांच्या रक्ताने भिजलेल्या हत्याकांडाचे समर्थन केले होते. अनेक काँग्रेस नेते रस्त्यावर उतरले आणि रक्ताचा बदला रक्ताने घेतला जाईल अशा घोषणा दिल्या, महिलांवर बलात्कार झाले, शीख पुरुषांना जळत्या टायरभोवती गुंडाळण्यात आले, असे मालवीय म्हणाले होते.