भारत जोडो यात्रा पुलवामातून पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 08:38 AM2023-01-29T08:38:41+5:302023-01-29T08:39:03+5:30

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शनिवारी जम्मू-काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथून पुन्हा सुरू झाली. सुरक्षाविषयक त्रुटींमुळे शुक्रवारी यात्रा स्थगित करण्यात आली होती.

Bharat Jodo Yatra resumes from Pulwama | भारत जोडो यात्रा पुलवामातून पुन्हा सुरू

भारत जोडो यात्रा पुलवामातून पुन्हा सुरू

Next

अवंतीपोरा/लेथपोरा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शनिवारी जम्मू-काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथून पुन्हा सुरू झाली. सुरक्षाविषयक त्रुटींमुळे शुक्रवारी यात्रा स्थगित करण्यात आली होती. जम्मू-काश्मीर प्रशासनाची सुरक्षाव्यवस्था पूर्णत: कोलमडल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. नियोजनापेक्षा किती तरी अधिक गर्दी झाल्यामुळे सुरक्षाव्यवस्थेवर दबाव आला होता, असा खुलासा त्यावर प्रशासनाने केला आहे. त्यानंतर शनिवारी पुरेशा सुरक्षाव्यवस्थेत यात्रा पुन्हा सुरू झाली. राहुल गांधी यांच्याभोवती ३ सुरक्षा कडे उभारण्यात आले आहेत.

प्रियांका, मेहबुबा यांचा यात्रेत सहभाग
दक्षिण काश्मिरातील चुरसू येथे हजारो लोकांनी राहुल गांधी यांच्यासमवेत पदयात्रा केली. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती आणि त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती या यात्रेत सहभागी झाल्या. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही लेथपोरा येथे यात्रेस हजेरी लावली. बरेच अंतर त्या यात्रेसोबत चालत गेल्या.
शहिदांना श्रद्धांजली
२०१९ मध्ये पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या ४० जवानांना राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली. श्रीनगरच्या दिशेने जाणारी यात्रा घटनास्थळी काही वेळ थांबली. 

Web Title: Bharat Jodo Yatra resumes from Pulwama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.