Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा? मध्य प्रदेश पोलिसांनी केली कारवाई...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 04:07 PM2022-11-27T16:07:16+5:302022-11-27T16:07:29+5:30
काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.
Congress Viral Video on Pakistan: काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खरगोनचे एसपी धरमवीर सिंह यादव यांनी सांगितले की, शनिवारी सनावद पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध कलम 153(बी) आणि 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत जोड़ो यात्रा में खुलेआम नारा लगा "पाकिस्तान जिंदाबाद"
— लोकेन्द्र पाराशर Lokendra parashar (@LokendraParasar) November 25, 2022
इसे कांग्रेस के ऑफिशियल हैंडल से ट्वीट किया गया , बाद में हटाया गया, लेकिन सच्चाई तो सामने आ गई कि कांग्रेस के दिल में क्या है pic.twitter.com/c6gm1S7cUj
पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी?
2 दिवसांपूर्वी 21 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ फिरताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या शेवटी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणांचा आवाज ऐकू येतोय. हा व्हिडिओ 25 नोव्हेंबरच्या सकाळचा आहे. यावेळी यात्रा खरगोन जिल्ह्यातील सनावद भागातील भानभरड गावातून जात होती.
सध्या यात्रा मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण तापले आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की हा एक बनावट व्हिडिओ आहे, ज्याद्वारे भाजप राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या मध्य प्रदेश युनिटचे मीडिया प्रभारी केके मिश्रा यांनी दावा केला आहे की व्हिडिओ खरा असून, बनावट आहे.