नवी दिल्ली : राष्ट्रवाद व ‘भारत माता की जय’ या घोषणेचा उग्रवादी विचारांसाठी वापर केला जात आहे, अशी घणाघाती टीका माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केली आहे. जवाहरलाल नेहरू यांचे कार्य व विचार यावरील पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांनी भाजपचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.ते म्हणाले की, भारत एक जिवंत लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. याचा पाया रचला आहे तो पहिले पंतप्रधान नेहरू यांनी. त्यांनी सामाजिक व राजकीय विचारांच्या द्वारे लोकशाहीचा एक मार्ग तयार केला. नेहरूंनी अनेक बहुभाषी विद्यापीठे, अकादमींचा पाया ठेवला. त्यांनी सांस्कृतिक संस्थांची स्थापना केली. परंतु नेहरूंच्या नेतृत्वातील स्वतंत्र भारत जसा होता तसा आज नाही.
'‘भारत माता की जय’ घोषणेचा उग्रवादी विचारांसाठी वापर'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 4:53 AM