नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'भारत टेक्स 2024' चे उद्घाटन केले. दरम्यान, वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित जागतिक स्तरावर आजपर्यंतचा हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. 26 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान ‘भारत टेक्स 2024’चे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5 एफ व्हिजनपासून प्रेरणा घेऊन, या कार्यक्रमात फायबर, फॅब्रिक आणि फॅशनच्या माध्यमातून शेतीपासून ते परदेशापर्यंत एकात्मिक फोकस आहे. ज्यामध्ये संपूर्ण टेक्सटाईल व्हॅल्यू चेन समाविष्ट आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आजचा कार्यक्रम खूप खास आहे, विशेषत: तो भारत मंडपम आणि यशोभूमी या भारतातील दोन सर्वात मोठ्या प्रदर्शन केंद्रांमध्ये एकाच वेळी आयोजित केला जात आहे."
आजचा कार्यक्रम हा केवळ टेक्सटाईल एक्स्पो नाही. या आयोजनाच्या एका धाग्याशी अनेक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. भारत टेक्सचे हे सूत्र भारताच्या गौरवशाली इतिहासाला आजच्या प्रतिभेशी जोडत आहे. भारत टेक्सचा हा फॉर्म्युला तंत्रज्ञानासोबत विणकाम करणारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, भारत टेक्सचे हे सूत्र शैली, टिकाव, प्रमाण आणि कौशल्य एकत्र आणण्याचे सूत्र आहे. प्रत्येक 10 वस्त्र निर्मात्यांपैकी 7 महिला आहेत आणि हातमागात ते त्याहूनही अधिक आहे. कापडाच्या व्यतिरिक्त खादीने आपल्या भारतातील महिलांना नवीन बळ दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
याचबरोबर, मी असे म्हणू शकतो की, गेल्या 10 वर्षात आपण जे काही प्रयत्न केले, ते खादी हे विकास आणि रोजगार या दोन्हीचे साधन बनले आहे. आज भारत जगातील कापूस, ताग आणि रेशीम उत्पादक देशांपैकी एक आहे. लाखो शेतकरी या कामात गुंतले आहेत. आज सरकार लाखो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देत आहे, त्यांच्याकडून लाखो क्विंटल कापूस खरेदी करत आहे. सरकारने सुरू केलेला कस्तुरी कापूस भारताची स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे. देशाला ग्लोबल हब बनवू, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.