भरतपूर: राजस्थानच्या भरतपूर शहरातील अपना घर आश्रमात राहणारी महिला गेल्या ५ महिन्यांपासून कोरोना विरुद्ध लढत आहे. शारदा देवी यांचा ३२ वा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे डॉक्टर वर्ग चिंतेत आहे. ४ सप्टेंबरला शारदा देवी यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तेव्हापासून त्यांचे ३२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शारदा देवी यांना अधिक चांगले उपचार मिळावेत यासाठी जयपूरला हलवण्यात येणार होतं. मात्र अद्याप तरी याबद्दलचा निर्णय झालेला नाही.घसा कोरडा झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो? जाणून घ्या 'या' व्हायरल मेसेज मागचं सत्यभरतपूरच्या अपना घर आश्रमात राहात असलेल्या शारदा देवी गेल्या ५ महिन्यांपासून कोरोनाविरुद्ध लढत आहेत. ४ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र अद्याप त्या कोरोनामुक्त झालेल्या नाहीत. गेल्या ५ महिन्यांत त्यांच्या ३२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्या सगळ्या पॉझिटिव्ह आल्या. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही शारदा देवी बऱ्या झालेल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टरदेखील चिंतेत आहेत. कोरोना टेस्टसाठी स्वॅब स्टिक नाकात टाकल्याने खरंच 'ही' गंभीर समस्या होते का?अपना घर आश्रमचे संचालक डॉ. बी. एम. भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा देवींच्या आई वडिलांचं निधन झालं आहे. त्यांना सासरच्या माणसांनी घराबाहेर काढलं आहे. त्यानंतर त्या अपना आश्रमात आल्या. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ४ सप्टेंबरला चाचणीचा अहवाल आला. तो पॉझिटिव्ह आला. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांत ३२ वेळा शारदा देवींची कोरोना चाचणी करण्यात आली. या सगळ्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शारदा देवी गेल्या ५ महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कोरोनाची लागण झालेले रुग्ण काही दिवसांत बरे होतात. मात्र शारदा देवी कोरोनामुक्त होत नसल्यानं डॉक्टरदेखील आश्चर्य चकित झाले आहेत. गेल्या ५ महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं शारदा देवींचं वजनदेखील वाढत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या चिंतेत भर पडली आहे.
५ महिन्यांपासून सुरूय कोरोनाविरुद्धचा लढा; आता ३२वा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, डॉक्टर चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 1:22 PM