मुंबई: भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या भारती एअरटेलकडून त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर लाँच करण्यात आली आहे. एअरटेल आणि एचएमडी ग्लोबल यांच्यात झालेल्या करारानुसार प्रीपेड सेवा घेतलेल्या ग्राहकांनी फिनिश या कंपनीचा स्मार्टफोन अथवा नोकिया 3, नोकिया 2 हे फोन खरेदी केल्यास त्यांना या सुविधेचा लाभ उठवता येणार आहे. हे फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 169 रूपयांच्या रिचार्जमध्ये 1 जीबी मोबाईल डेटा आणि मोफत लोकल कॉल्स आणि नॅशनल कॉल्सची सुविधा मिळणार आहे. तसेच त्यांना 2000 रूपये कॅशबॅक मिळणार आहे. मात्र, या विशेष ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी प्रीपेड ग्राहकांना सुरुवातीला 3500 रूपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. ग्राहकांनी 18 महिन्यांच्या काळात 3500 रूपयांचा रिचार्ज केल्यास त्यांना कॅशबॅकचा 500 रूपयांचा पहिला हप्ता मिळेल. तर पुढच्या 18 महिन्यांत 3500 रूपयांचा रिचार्ज केल्यास उर्वरित 1500 रूपयांची कॅशबॅक मिळेल. त्यामुळे ग्राहकांना नोकिया 2 साठी 6,999 ऐवजी 4,999 रूपये मोजावे लागतील. तर 9,499 इतकी किंमत असणारा नोकिया 3 फोन ग्राहकांना 7,499 रूपयांमध्ये मिळणार आहे.
एअरटेलच्या ग्राहकांना 'या' स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार 2000 रूपयांचा कॅशबॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 12:18 PM