शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भीम आर्मीची दिल्लीत जोरदार निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 4:58 AM

संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद निसटले; पोलिसांच्या हातावर तुरी

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जामा मशिदीजवळ जोरदार निदर्शने केली. परवानगी नसतानाही निदर्शने केल्याबद्दल ताब्यात घेतलेले चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटले. त्यांचा शोध सुरू आहे.

निदर्शने करणाऱ्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हातात तिरंगी ध्वज घेतले होते. राज्यघटनेला वाचवा तसेच इन्किलाब झिंदाबाद अशा घोषणा ते देत होते. त्यातले काही जण सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गाणे गात होते. जामा मशिदीच्या एक क्रमांकाच्या प्रवेशव्दाराजवळ जमा झालेल्या या निदर्शकांपैकी काही जणांच्या हाती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम, भगतसिंह यांची छायाचित्रे असलेले फलक होते. दिल्लीमध्ये लागू केलेले जमावबंदीचे आदेश मोडून हजारो विद्यार्थी, विरोधी पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरून गेल्या काही दिवसांत निदर्शने केली होती. तोेच कित्ता भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी गिरवला.

जमावबंदीचे आदेश झुगारुन निदर्शने केल्याच्या आरोपावरून अटक केलेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जामा मशिदीच्या जवळ पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तिथे यश न आल्यामुळे दर्यागंज भागामध्ये पुन्हा त्यांना पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन चंद्रशेखर आझाद तिथून निसटले असे भीम आर्मीच्या सूत्रांनी सांगितले. मात्र पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही.

४८ जणांना अटकगुजरातमधील अहमदाबाद शहरातील शहा-ए-आलम भागात गुरुवारी झालेल्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले होते. या प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक शहजाद खान पठाण व ४८ जणांना अटक करण्यात आली आहे. शहजाद खान पठाण यांनी जमावाला भडकाविण्याचा प्रयत्न केला असाही त्यांच्यावर आरोप आहे. निदर्शकांनी केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह २६ पोलीस जखमी झाले होते.

नव्याने घुसखोरी होणार नाही : सोनोवालनागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे बांगलादेशमधून नव्याने घुसखोरी होण्यास प्रोत्साहन मिळणार नाही. या कायद्याचा आधार घेऊन बांगलादेशमधील एकही व्यक्ती आसाममध्ये येणार नाही असे आसामचे मुख्यमंत्री सवर्नंद सोनोवाल यांनी शुक्रवारी सांगितले. ते म्हणाले की, शेजारी राष्ट्रांत होणाºया धार्मिक छळाला कंटाळून तेथील जे नागरिक अनेक वर्षांपूर्वी भारतात आले त्यांनाच या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. अशा लोकांची संख्या मोजकी असेल. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर आसाममधील मूळ रहिवाशांची वांशिक ओळख पुसली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBhim Armyभीम आर्मी