या व्यक्तीचे नाव आहे भीम बहादूर तमांग. भारत - चीन बॉर्डरवर २५ वर्षांपासून ते टपालाची देवाणघेवाण करण्याचे म्हणजेच पोस्टमनचे काम करतात. सिक्कीमच्या नाथू ला पास या डोंगरी भागात दर गुरुवारी १४ हजार फूट उंचीवर जाऊन जे टपाल पोचवितात. जॅकेट, कानाला टोपी असा वेषातील भीम बहादूर तमांग वर्षानुवर्षे ही सेवा इमानइतबारे करत आहेत. पोस्ट खात्याचे कर्मचारी असलेले भीम बहादूर सांगतात की, बॅगचे अदान प्रदान करणे आणि कागदांवर हस्ताक्षर करणे एवढेच आमचे काम आहे. आमच्यात कोणताही संवाद होत नाही. मला हिंदी व नेपाळी भाषा येतात. आमचे चीनी मित्र कधीच काहीच बोलत नाहीत. १९९२ च्या भारत - चीन करारानुसार टपालाचे अदान प्रदान करण्याचा निर्णय झाला. गंगटोकपासून ५५ किमी अंतरावर असलेल्या नाथू ला भागातील बॉर्डरवरून हे अदान प्रदान होते. सीमेपासून सात किमी दूर असलेल्या सिक्कीमच्या शेरतांग गावात भीम बहादूर राहतात. तमांग यांना या कामासाठी महिना १३ हजार रुपये मिळतात. दर रविवारी आणि गुुरुवारी या दोन देशातील टपालाची देवाणघेवाण होत असते.
भारत - चीन सीमेवरील ‘भीम’पराक्रम
By admin | Published: April 19, 2017 1:59 AM