भिंड - लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर माणसांची ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे प्राणी मुक्त संचाराचा आनंद घेताना दिसून येत आहेत. विविध ठिकाणी रस्त्यांवर जंगली प्राणी फिरताना दिसून येत आहेत. साप पाहिल्यावर सर्वांचीच घाबरगुंडी उडते. मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. चचाई या गावातील एक घरातून दररोज सापाची 5 ते 25 पिल्ले बाहेर येत असल्याची घटना घडली आहे. गेल्या आठ दिवसांत सापाची तब्बल 123 पिल्ले बाहेर निघाली आहेत. गावातील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्य प्रदेशच्या चचाई गावात ही घटना घडली आहे. सापामुळे घरातील सर्वच मंडळी धास्तावले आहेत. कुटुंबातील लहान मुलं देखील घाबरून शेजारच्या घरात झोपण्यासाठी जात आहेत. चचाई गावचे रहिवासी असलेल्या राजकुमार कुशवाहा यांच्या घरामध्ये रात्रीच्या वेळी दररोज सापाची काही पिल्ले बाहेर येत आहेत. या घरात 12 जणांचे कुटुंब राहते मात्र सापामुळे दहशत निर्माण झाली असून कुटुंबातील काही सदस्य हे रात्रीच्या वेळी गावातील इतर घरांमध्ये झोपायला जात आहेत.
राजकुमार यांच्या घरामध्ये एक स्टोर रुम आहे. साधारण आठ दिवसांपूर्वी अचानक संध्याकाळी साडे सातच्या सुमारास सापाची 4 ते 5 पिल्ले ही स्टोर रुमच्या फरशीवर दिसली. कुटुंबाने ही सापाची पिल्ले उचलली आणि गावाच्या बाहेर असलेल्या सापाच्या एका बिळामध्ये त्यांना सोडलं मात्र त्यानंतर ही त्यांच्या घरामध्ये सापाची पिल्ले आढळून आली आहेत. गेल्या आठ दिवसांत जवळपास सापाची 123 पिल्ले स्टोर रुममधून बाहेर निघाली आहेत. एका दिवशी 51 तर दुसऱ्यादिवशी 21 पिल्ले बाहेर आली त्यानंतर कधी 5 तर कधी 8 पिल्ले बाहेर येत असल्याची माहिती कुटुंबांतील एक सदस्याने दिली आहे.
गावातील पंचायतीला देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. स्टोर रुममधील एका सुरक्षित ठिकाणी सापाने अंडी घातली असतील. त्यांचा वेळ पूर्ण झाल्याने आता त्या अंड्यातून पिल्ले बाहेर येत आहेत अशी माहिती ही गारुडी असलेल्या महेंद्रनाथ यांनी दिली आहे. तर घरात सापडलेले सर्व साप हे कोब्रा जातीचे असून एक साप साधारण 150 ते 225 अंडी देतो अशी माहिती प्रोफेसर इकबाल अली यांनी दिली आहे. एक हिंदी वेबसाईटने याबतचे वृत्त दिले आहे.
कौतुकास्पद! डॉ. हर्षवर्धन यांचा देशाला अभिमान; जागतिक आरोग्य संघटनेत मिळालं मानाचं स्थान
CoronaVirus News : सरकारच्या 'या' योजनेचा 1 कोटी गरिबांना मिळाला आधार; मोदी म्हणाले...
CoronaVirus News : काय सांगता? संगीत ऐकून कोरोनाग्रस्त बरे होणार; 'ही' थेरेपी फायदेशीर ठरणार
CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊननंतर चिमुकल्यांची होईल भयानक अवस्था?; नोबेल विजेते म्हणतात...
CoronaVirus News : "सरकारचा 'हा' निर्णय दिल्लीकरांसाठी डेट वॉरंट ठरू शकतो"