भिवापूर.. मोर्चा जोड
By admin | Published: February 11, 2015 12:33 AM
राज्यव्यापी आंदोलनाचे कनेक्शन
राज्यव्यापी आंदोलनाचे कनेक्शनरेशन व केरोसिन डिलर्सच्या अखिल भारतीय संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या संदर्भात देशव्यापी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. २६ जानेवारीला ऑल इंडिया फेअर प्राईस ॲण्ड केरोसिन डिलर्सच्या पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मेळाव्यात प्रल्हाद मोदी यांनी आपल्या भाषणात दुकानदारांच्या मागण्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या या भूमिकेबाबत विरोध दर्शवित आंदोलनाचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. त्यानुसार मंगळवारी संपूर्ण राज्यात स्वस्त धान्य दुकानदारांनी आंदोलन पुकारले. भिवापूर तालुका दुकानदार संघटनेतर्फे स्थानिक तहसील कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांकडे लक्ष वेधले, हे विशेष.