ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - देशात सध्या निवडणूकीचे वारे वाहत असतानाच सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेते रवी किशन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी नवी दिल्लीत पक्षामध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणुक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांना भाजपाच्या उमेदवाराकडून दारुण पराभवाला सामोर जावे लागले होते. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, गरीबांचा विचार करणाऱ्या पक्षात येऊन आनंद झाला. इतरांच्या अवमानापेक्षा विकासावर आपला भर असेल. दिल्ली भाजपचे प्रमुख आणि खासदार मनोज तिवारी यांनी रविवारी ट्विटरवर रवीकिशनचा भाजपप्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता.
Actor Ravi Kishan joins BJP in presence of party president Amit Shah pic.twitter.com/x2WAuVMZri— ANI (@ANI_news) February 19, 2017