भोपाळमध्ये १००० खाटांचे जम्बो क्वारंटाईन सेंटर, रुग्णांना भव्य पडद्यावर रामायण पाहण्याची व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 05:31 PM2021-05-10T17:31:29+5:302021-05-10T17:32:04+5:30
quarantine center : हे क्वारंटाईन अशा कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांच्या घरी आयसोलेशनमध्ये राहण्याची व्यवस्था नाही.
भोपाळ : कोरोना संकट काळाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये असलेल्या मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये १००० खाटांचे क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहे. भोपाळ जिल्हा भाजपा आणि माधव सेवा केंद्रच्यावतीने तयार करण्यात आलेल्या या क्वारंटाईन सेंटरचे उद्धाटन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. विशेष म्हणजे, या क्वारंटाईन सेंटरमध्ये टीव्हीवर योगापासून ते रामायण दाखवण्याची सोय करण्यात आली आहे. (bhopal 1000 bed quarantine center started facility to show ramayana and mahabharata serial mp corona crisis)
याचबरोबर, हे क्वारंटाईन अशा कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांच्या घरी आयसोलेशनमध्ये राहण्याची व्यवस्था नाही. तसेच या सेंटरमध्ये वेगवेगळे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. त्या प्रत्येक वॉर्डला स्वातंत्र्य सैनिक आणि महापुरुषांची नावे देण्यात आली आहे. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, अब्दुल कलाम, सरदार पटेल, राजा भोज, राणी लक्ष्मीबाई, राणी कमलापती अशी नावे वॉर्डला देण्यात आली आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये ३५ ते ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी, जिला भोपाल द्वारा मोतीलाल नेहरू स्टेडियम, भोपाल में बनाये गए 1000 बेड के माधव सेवा केंद्र #Covid केयर सेंटर की शुरुआत आज केंद्रीय मंत्री श्री @dpradhanbjp जी एवं मुख्यमंत्री श्री @ChouhanShivraj जी द्वारा की गई। #SevaHiSangathanpic.twitter.com/gbLViGaTwr
— VD Sharma (@vdsharmabjp) May 9, 2021
रामायण पाहण्याची व्यवस्था
या क्वारंटाईन सेंटरमध्ये खाटांजवळ पाणी गरम करण्याची व्यवस्था आणि मोबाईल चार्जिंग पॉईंट असणार आहे. ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांजवळ ऑक्सिजन कंसट्रेटर मशीन ठेवण्यात आली आहे. याशिवाय, रुग्णांना याठिकाणी रोज योगा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, सेंटरमध्ये मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. त्याच्यावर रामायण आणि महाभारत या मालिका दाखवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर दिवसभर महामृत्यूंजय मंत्र आमि गायत्री मंत्र जप चालणार आहे.