१२ वर्षांनी घरात पाळणा हलला, आगीनं घात केला; चिमुरड्याच्या मृत्यूनं आईनं हंबरडा फोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 12:29 PM2021-11-09T12:29:25+5:302021-11-09T12:30:13+5:30

Bhopal Hamidia Kamala Neharu Hospital Fire: १२ वर्षांनी घरात पाळणा हलल्यानं सगळं कुटुंब आनंदात होतं. अन् अवघ्या ९ दिवसात नियतीने घात केला

Bhopal Hamidia Kamala Neharu Hospital Fire, Mother lost her new born child | १२ वर्षांनी घरात पाळणा हलला, आगीनं घात केला; चिमुरड्याच्या मृत्यूनं आईनं हंबरडा फोडला

१२ वर्षांनी घरात पाळणा हलला, आगीनं घात केला; चिमुरड्याच्या मृत्यूनं आईनं हंबरडा फोडला

Next

भोपाळ – हमीदिया कॅम्पसच्या कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत एका आईनं स्वत:च्या चिमुकल्याला गमावलं आहे. लग्नाच्या १२ वर्षांनी २ नोव्हेंबरला घरात पाळणा हलला होता. मुलाला श्वास घेण्यास अडचण असल्याने त्याला कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास लागलेल्या आगीनं घात केला. त्यानंतर नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये जाण्यास बंदी घातली.

आगीच्या घटनेनं रुग्णांच्या नातेवाईकांनी आरडाओरड सुरु केली. पहाटे ४ च्या सुमारास आग नियंत्रणात आल्यानंतर हॉस्पिटलचा दरवाजा उघडला. ४ चिमुरड्यांचे मृतदेह दाखवले. त्यातील एक मुलगा इरफानाचा होता. आपल्या काळजाच्या तुकड्याला असं पाहून आई बेशुद्ध झाली. चिमुरड्याचा मृतदेह पाहून आईनं हंबरडा फोडला. नातेवाईकांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला पण आयुष्यात कधीही न भरून येणारं दु:ख या मातेच्या पदरात पडलं होतं.

DIG बंगल्याजवळ गौतम नगर परिसरात राहणारी इरफानाचं लग्न १२ वर्षापूर्वी झालं होतं. नसरुल्लागंज येथील रहिवासी रईस खानसोबत तिचा निकाह झाला होता. रईस बुटांचा व्यवसाय करायचा. इरफानाची बहीण फरजानाने सांगितले की, २ नोव्हेंबरला इरफानाची नॉर्मल डिलीव्हरी झाली होती. नवजात बालकाला श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून त्याला कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सोमवारी रात्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये आग लागली तेव्हा सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्यात इरफानाही हॉस्पिटलबाहेर होती. पहाटे ४ च्या सुमारात इरफानाला तिच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी कळाली त्याने तिला मोठा धक्का बसला.

मुलाच्या निधनानं आईवर कोसळला दु:खाचा डोंगर

१२ वर्षांनी घरात पाळणा हलला अन् अवघ्या ९ दिवसात नियतीने घात केला. हॉस्पिटलला लागलेल्या आगीत इरफानानं तिच्या चिमुरड्याला गमावलं. मला माझा मुलगा दाखवा असं ७ तास हॉस्पिटलबाहेर सातत्याने ओरडत राहणाऱ्या इरफानाला नातेवाईकांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मुलगा ठीक आहे. पण नियतीच्या मनात भलतंच काही होतं. पहाटे ४ च्या सुमारास मुलाच्या भेटीसाठी व्याकुळ असलेल्या आईला त्याचा मृतदेह नजरेस पडला आणि तिने जोरात हंबरडा फोडला. या घटनेने अनेकांच्या मनाला चटका लावला. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. असं दु:ख परमेश्वरा कुणाच्या वाट्याला देऊ नये असं प्रत्येकजण बोलत होतं.  

Web Title: Bhopal Hamidia Kamala Neharu Hospital Fire, Mother lost her new born child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.