ऑनलाइन लोकमत
शाजापूर, दि. 7 - भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोट आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटात चार जणं जखमी झाली आहेत. रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
भोपाळपासून जवळपास 120 किमी दूर कालापीपल येथील जबडी स्टेशनजवळ हा स्फोट झाला. सकाळी 9 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास हा स्फोट झाला. जखमींना कालापीपलच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
स्फोट होण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही अशी माहिती भोपाळ डिव्हीजनचे पीआरओ सिद्दीकी यांनी दिली.
स्फोटानंतर ट्रेनमध्ये गोंधळ उडाला तर काही जणांनी ट्रेनमधून उडी देखील मारल्याचं वृत्त आहे.
मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंग यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून भोपाळहून बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे.