२८ हजार ठेवीदारांचे १३०० कोटी अडकले बीएचआर : प्रमोद रायसोनी व संचालकांची जेलवारी सुरूच
By admin | Published: November 27, 2015 9:33 PM
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार व फसवणुकीचे वादळ वाढत असताना पहिली खबर ही रामानंद नगर पोलीस स्टेशन दाखल झाली. २ फेब्रुवारीपासून सुरू झालेली संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी व संचालक मंडळाची जेलवारी आजपर्यंत सुरुच आहे. सुमारे २८ हजार ठेवीदारांची अंदाजे १३०० कोटी रुपयांची रक्कम विविध शाखांमध्ये अडकलेली आहे.
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार व फसवणुकीचे वादळ वाढत असताना पहिली खबर ही रामानंद नगर पोलीस स्टेशन दाखल झाली. २ फेब्रुवारीपासून सुरू झालेली संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी व संचालक मंडळाची जेलवारी आजपर्यंत सुरुच आहे. सुमारे २८ हजार ठेवीदारांची अंदाजे १३०० कोटी रुपयांची रक्कम विविध शाखांमध्ये अडकलेली आहे.शिवकॉलनीतील रहिवासी शिवराम चावदस चौधरी या सेवानिवृत्त शासकीय कर्मचार्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला २ फेब्रुवारी २०१५ रोजी २५ लाख ८१ हजार ८०२ रुपयांच्या फसवणुकीची पहिली फिर्याद दिली आहे. त्या पाठोपाठ जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जामनेर पोलीस स्टेशन, एरंडोल, चोपडा, भडगाव या ठिकाणी गुन्हे दाखल होऊ लागले.२ फेब्रवारी रोजी अटकसत्ररामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर २ फेब्रुवारीच्या मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास प्रमोद रायसोनी यांच्यासह संचालकांचे अटकसत्र सुरू झाले. जिल्हा न्यायालयात या सर्वांना पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर प्रमोद रायसोनी यांच्यासह संचालकांविरुद्ध राज्यभरात गुन्हे दाखल होऊ लागले. पहिल्या गुन्ातील पोलीस कोठडी संपली की दुसर्या गुन्ात या संशयितांना ताब्यात घेणे सुरू झाले. राज्यभरात ५८ ठिकाणी गुन्हे दाखलबीएचआर पतसंस्थेच्या सहा राज्यांमध्ये २६४ शाखा आहेत. सहकार आयुक्तांकडून झालेल्या चौकशी दरम्यान १६०७ कोटी रुपयांच्या बेनामी ठेवी समोर आल्या होत्या. राज्यभरातील ५८ ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष व संचालक व त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल आहेत. जळगाव जिल्ात सात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. राज्यभरातील २८ हजार ठेवीदारांचे सुमारे १३०० कोटी रुपये अडकलेले आहेत. प्रमोद रायसोनींसह संचालक आरोपीअपहार व फसवणुकीच्या प्रकरणात संस्थापक अध्यक्ष प्रमोद भाईचंद रायसोनी, दिलीप कांतीलाल चोरडिया, मोतीलाल ओंकार जिरी, सुरजमल भबुतमल जैन, दादा रामचंद्र पाटील, भागवत संपत माळी, राजाराम काशीनाथ माळी, भगवान हिरामण वाघ, डॉ.हितेंद्र यशवंत महाजन, इंद्रकुमार आत्माराम ललवाणी, शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार, ललिता राजू सोनवणे, प्रतिभा मोतीलाल जिरी, सुकलाल शहादू माळी, यशवंत ओंकार जिरी अशा १५ जणांना आरोपी केले. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्ात संचालक मंडळासोबतच शाखा व्यवस्थापक व वसुली अधिकारी यांना आरोपी करण्यात आले आहे.