शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
3
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
4
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
5
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
6
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
7
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
8
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
9
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
11
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
12
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
13
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
14
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
15
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
16
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
17
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
18
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
19
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
20
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

भुवनेश्वर रुग्णालयाचा मालक गायब

By admin | Published: October 20, 2016 4:36 AM

२१ जणांचे मृत्यू झाल्यानंतर इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस आणि हॉस्पिटलचे संस्थापक मालक मनोज नायक पोलीस कारवाईच्या भीतीने भूमिगत झाले

अंबिका प्रसाद कानुंगो,

भुवनेश्वर- येथील एसयूएम रुग्णालयातील आगीत २१ जणांचे मृत्यू झाल्यानंतर इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस आणि हॉस्पिटलचे संस्थापक मालक मनोज नायक पोलीस कारवाईच्या भीतीने भूमिगत झाले आहेत. हॉस्पिटलच्या चार अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून, इतर चार कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. नायक यांच्या अटकेसाठी आरडाओरड सुरू झाली आहे.नायक हे आयआयटीचे (खरगपूर) कॉम्प्युटर सायन्सचे पदवीधर व पीएच.डी.धारक आहेत. ते भुवनेश्वरच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे लेक्चरर म्हणून रुजू झाले. त्यांनी लेक्चररशिपच्या कालावधीत ‘शिक्षा ओ अनुसंधान’ ट्रस्ट स्थापन करून भुवनेश्वरमध्ये इन्स्टिट्यूट आॅफ टेक्निकल एज्युकेशन अँड रिसर्च सुरू केली. अतिशय वेगाने नायक यांनी किमान दहा शैक्षणिक संस्था स्थापन केल्या.नायक याआधी अनेक वादांत सापडलेले आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी प्रवेश परीक्षा घेणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नायक व इतर अनेकांविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व गुन्हेगारी कट रचण्याचा गुन्हा २००० मध्ये दाखल केला होता. आरोपपत्रात नायक यांचे नाव आल्यानंतरही त्यांनी अटक टाळली. राजकीय लागेबांधे वापरून त्यांनी व्यवसाय विस्तारला. नवीन पटनायक सरकारमधील अनेक मंत्र्यांशी नायक यांचे फार घनिष्ठ संबंध आहेत, असे सांगितले जाते.नायक यांनी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय सुरू केल्यानंतर काही वर्षांतच भुवनेश्वरमध्ये २००६ मध्ये एसयूएम हॉस्पिटल सुरू केले. आपल्या या हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागांत वाहने पाठविली आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना आणण्यासाठी मध्यस्थाचीही नेमणूक केली. या गटाकडून वैद्यकीय, दंत, अभियांत्रिकी, विधि महाविद्यालय, परिचारिकांना प्रशिक्षण शाळा, कृषी महाविद्यालय, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए आणि एमसीए महाविद्यालय चालविले जाते. या ग्रुपच्या मालकीची प्रादेशिक दूरचित्रवाणी वाहिनी आणि भाषिक दैनिकही आहे.ओडिशा मानवी हक्क आयोगाने (ओएचआरसी) या आगीच्या घटनेची स्वत:हून दखल घेत राज्याचे आरोग्य सचिव आणि महासंचालकांना (अग्निशमन सेवा) नोटीस देऊन तीन आठवड्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले. सम हॉस्पिटलचे अधिकारी आणि राज्य सरकारचे अधिकारी यांनी सुरक्षेच्या उपायांकडे हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे मानवी हक्क कार्यकर्ते सुभाष मोहपात्र यांनी केली आहे. आगीच्या घटनेची नि:पक्षपाती चौकशी करून एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशीही मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.>नर्सचे धाडसआगीच्या भयंकर संकटात बेबी भवानी (३०) या सहायक परिचारिकेने जीव धोक्यात घालून तिच्या देखरेखीखाली असलेल्या रुग्णांना ४० मिनिटे सांभाळले. तिची नेमणूक अति दक्षता विभागात होती. कृत्रिम श्वासोच्छासावर ठेवलेल्या रुग्णांना बेबी सोडून गेली नाही. धाडस आणि व्यावसायिक कौशल्यच तिने पणाला लावले होते. श्वास गुदमरल्यामुळे तिने रुग्णांना मरताना बघितले. बेबी भवानी आणि अन्य दोन परिचारिकांवर येथील एएमआरआय हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेचा बेबीला भयंकर धक्का बसला.