Bhupesh Baghel: भगवान रामाला 'रँबो' आणि हनुमानाला 'आक्रमक' दाखवण्याचा प्रयत्न, CM बघेल यांचे भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:34 AM2022-05-10T10:34:22+5:302022-05-10T10:34:31+5:30

Bhupesh Baghel: "भगवान राम शांतीचे तर हनुमान भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांना क्रोधात दाखवणे समाजाला शोभणारे नाही."

Bhupesh Baghel: Attempt to portray Lord Rama as 'Rambo' and Hanuman as 'Aggressive', CM Baghel criticizes BJP | Bhupesh Baghel: भगवान रामाला 'रँबो' आणि हनुमानाला 'आक्रमक' दाखवण्याचा प्रयत्न, CM बघेल यांचे भाजपवर टीकास्त्र

Bhupesh Baghel: भगवान रामाला 'रँबो' आणि हनुमानाला 'आक्रमक' दाखवण्याचा प्रयत्न, CM बघेल यांचे भाजपवर टीकास्त्र

Next

CM Bhupesh Baghel on Lord Ram and Hanuman: सध्या महाराष्ट्रासह देशभरात हनुमान चालिसेवरुन राजकारण ढवळून निघाले आहे. यावरुनच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) मोठा आरोप केला आहे. "भाजप-आरएसएस भगवान राम आणि बजरंगबली यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत," असा आरोप बघेल यांनी केला.

भगवान राम हे सन्मान आणि शांतीचे प्रतीक आहेत
अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, "भगवान राम हे सन्मान आणि शांतीचे प्रतीक आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांना योद्धा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपकडून भगवान राम यांना 'रॅम्बो राम' आणि भगवान हनुमानाला 'आक्रमक' दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दोन्ही महापुरुषांची प्रतिमा आक्रमक बनवणे समाजासाठी चांगले नाही," असे बघेल म्हणाले. 

बजरंगबलीचे रौद्र रुप दाखवले जाते
मुख्यमंत्री भूपेश बघेल पुढे म्हणतात की, "आम्ही नेहमीच रामराज्याचा विचार करतो. पण, भक्ती, ज्ञान आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमानाचे क्रोधी रुप दाखवले जात आहे. हे समाजासाठी योग्य नाही. आपण प्रभू रामांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो. याआधी मंदिरांमध्ये किंवा जिथे जिथे रामाच्या मूर्ती बनवल्या गेल्या, तिथे त्यांचे अतिशय सौम्य रुप दाखवण्यात आले. पण, भाजपकडून आता त्यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सरू आहे."

Web Title: Bhupesh Baghel: Attempt to portray Lord Rama as 'Rambo' and Hanuman as 'Aggressive', CM Baghel criticizes BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.