भूपेश बघेल यांनी घेतली छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 06:54 PM2018-12-17T18:54:41+5:302018-12-17T18:59:58+5:30
शपथविधीच्या काही तास आधीच पाऊस सुरु झाल्याने शपथविधीचे स्थळ बदलण्यात आले.
रायपूर : छत्तीसगडमध्ये भाजपचा मोठा पराभव करत काँग्रेसने सत्ता स्थापन केली असून भूपेश बघेल यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बघेल यांच्यासोबत टी एस सिंहदेव आणि ताम्रध्वज साहू यांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
शपथविधीच्या काही तास आधीच पाऊस सुरु झाल्याने शपथविधीचे स्थळ बदलण्यात आले. हा सोहळा सायंन्स कॉलेज मैदानावर होणार होता. मात्र, ऐनवेळी बलवीर सिंह जुनेजा इनडोअर स्टेडिअमवर हा सोहळा घेण्यात आला.
Raipur: T. S. Singh Deo and Tamradhwaj Sahu take oath as ministers #Chhattisgarhpic.twitter.com/gZcJs2YGxy
— ANI (@ANI) December 17, 2018
Raipur: Bhupesh Baghel takes oath as the next Chief Minister of #Chhattisgarhpic.twitter.com/YMOnKaOf92
— ANI (@ANI) December 17, 2018
दरम्यान, आज दुपारी कमलनाथ यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जांबुरी मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते. कमलनाथ काँग्रेसचे 18वे मुख्यमंत्री आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला.