शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

दुचाकीस्वारांनो! केंद्राने नियम बदलले; अपघात टाळण्यासाठी नवा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 21:24 IST

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या या नवीन नियमांनुसार दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना दोन्ही बाजुला हात धरण्यासाठी हँड होल्डर असणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही बाजुंना फुटरेस्ट असणे आवश्यक करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : देशातील एकूण अपघातांमध्ये दुचाकींच्या अपघाताचे प्रमाण मोठे आहे. तसेच अपघाती मृत्यूमध्येही दुचाकीस्वारांचा मोठा आकडा आहे. यामुळे केंद्र सरकारने रस्ते सुरक्षा नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. खासकरून दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तींसाठी हे नियम आहेत. (New Guidelines for two wheeler)

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या या नवीन नियमांनुसार दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना दोन्ही बाजुला हात धरण्यासाठी हँड होल्डर असणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही बाजुंना फुटरेस्ट असणे आवश्यक करण्यात आले आहे. अनेकदा साडी किंवा ओढणी चाकात गुंडाळली गेल्याने दुचाकीचे चाक जाम होऊन अपघात झालेले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी मागच्या चाकाचा अर्धा भाग हा कव्हर केलेला असावा. त्यामुळे मागे बसणाऱ्याचे कपडे त्यात जाणार नाहीत. 

दुचाकीवर कमी वजनाचा कंटेनरही बसवता येणार आहे. त्याची लांबी 550 MM तर रुंदी 510 MM आणि उंची 500 MM पेक्षा  जास्त नसावी. यामध्ये 30 किलो पेक्षा जास्त वजन ठेवू नये. दुचाकीवर अशा प्रकारचं कंटेनर  बसविले तर मागे कोणालाही बसविण्य़ाची परवानगी नाही. स्कूटरवर विंडस्क्रीन लावता येणार आहे,. मात्र, याची काच सुरक्षित मटेरिअलपासून बनलेली हवी. तसेच कारमध्येही मागची काचेवर 70 टक्के दृष्यमानता असलेले safety glazing लावता येणार आहे. 

हे नवे नियम 1 जानेवारी 2022 पासून अस्तित्वात येणार आहेत. त्यानंतर ज्या दुचाकी उत्पादन करण्यात येतील त्यांच्यामध्ये AIS 146:2018 नुसार बदल केलेले असणार आहेत.  दरम्यान, ट्युबलेस टायरच्या कारना स्टेपनीशिवाय रस्त्यावर धावण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र, या कारमध्ये टायर रिपेअर किट आणि टायर प्रेशर मॉनिटर सिस्टिम (TPMS) असणे गरजेचे आहे. हा नियम येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

लॉकडाऊनने एसटीचे आर्थिक गणित बिघडवले; स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी

बापरे! शेअर बाजारात Axis ने धुमाकूळ घातला; तब्बल 6553 टक्क्यांची वाढ नोंदविली, कारण वाचा...

सहानुभूती संपलीय का?; कर्मचारी कपातीवरून रतन टाटा 'भडकले', उद्योगपतींना चांगलेच सुनावले

घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा; जाणून घ्या अवघ्या काही मिनिटांची प्रोसेस

सावध व्हा! जागावाटपही झाले; पवार-ठाकरे पॅटर्नवर संजय काकडेंचे भाकित

सीरमच्या आदार पुनावालांची कोरोना लसीवर मोठी घोषणा; '30- 40 कोटी डोस डिसेंबरपर्यंत'

टॅग्स :two wheelerटू व्हीलरmotercycleमोटारसायकलcarकार