वॉशिंग्टन : अमेरिकेतील नवनिर्वाचित जो बायडेन प्रशासन अमेरिका-तालिबान कराराचा आढावा घेणार आहे. अफगाण शांतता करारानुसार हिंसाचारात घट झाली किंवा नाही, यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते एमिली हॉर्न यांनी सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी आपले समकक्ष हमदुल्ला मोहिब यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी दीर्घकालीक, योग्य व राजकीय समाधान व स्थायी युद्धबंदी प्रस्थापित करणे, हा याचा उद्देश आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
अमेरिका फेब्रुवारी २०२१ मध्ये अमेरिका-तालिबान कराराचा आढावा घेणार आहेत. अफगाणमध्ये हिंसाचार कमी करणे तसेच अफगाणमधील दहशतवादी संघटनांशी संबंध कमी करण्याचे वचन तालिबानने पाळले आहे किंवा नाही, याचा आढावा घेण्यात येणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मागील फेब्रुवारीत दोहा येथे तालिबानसमवेत शांतता समझोत्यावर हस्ताक्षर केले होते. या समझोत्याच्या अंतर्गत विद्रोही समूहांकडून सुरक्षेच्या हमीच्या बदल्यात अफगाणमधून अमेरिकी सैनिकांची घरवापसीची योजना तयार केली जात आहे.
समझोत्यानुसार, अमेरिकेला १४ महिन्यांत आपल्या १२,००० सैनिकांना परत बोलवायचे आहे. तेथे आता अमेरिकेचे २५०० सैनिक आहेत.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मागील फेब्रुवारीत दोहा येथे तालिबानसमवेत शांतता समझोत्यावर हस्ताक्षर केले होते. समझोत्यानुसार, अमेरिकेला १४ महिन्यांत आपल्या १२,००० सैनिकांना परत बोलवायचे आहे. तेथे आता अमेरिकेचे २५०० सैनिक आहेत.