गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेनंतर आज सोमवारी उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात भीषण अपघात झाला. छठ पूजेदरम्यान कर्मनाशा नदीवर बांधलेला पूल अचानक कोसळल्याने पुलावर उभे असलेले १२ हून अधिकजण नदीत पडले. या घटनेनंतर गोंधळ उडाला. मात्र, नदीत पाणी कमी असल्याने कोणीही बुडाले नाही. आजूबाजूच् नागरिकांनी सर्वांना सुखरूप बाहेर काढले. अपघाताची माहिती घेऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले.
ही दुर्घटना उत्तर प्रदेशातील चकिया कोतवाली भागातील सरैया गावात घडली. चार दिवस चाललेल्या छठ उत्सवाचा आज शेवटचा दिवस होता. सरैय्या गावातून वाहणाऱ्या कर्मनाशा नदीजवळ पहाटेपासूनच महिला जमा झाल्या होत्या. नदीजवळ महिला पूजा करत होत्या. त्यांच्यासोबत आलेले कुटुंबीय नदीच्या पुलावर उभे राहून पूजा पाहत होते.
गुजरात सरकारला का कळालं नाही?; मोरबी दुर्घटनेवरून राष्ट्रवादीनं विचारला सवाल
यादरम्यान अचानक नदीवर बांधलेला पूल कोसळला. पुलावर १२ हून अधिकजण उभे होते. ह सर्वजण नदीत कोसळले. या नदीला जास्त पाणी नव्हते. त्यामुळे यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात छठ पूजेदरम्यान झाला. पुलावर काही लोक उभे होते, त्यावेळी अचानक पूल कोसळला. मात्र, कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.