छत्तीसगडमधील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात सोमवारी रात्री उशीरा भरधाव वेगात असलेली एक कार झाडाला धडकली. या धडकेनंतर कारने पेट घेतला. यात अपघातात कारमध्ये बसलेले दोन जण जिवंत जळाल्याची घटना घडली आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. यावेळी तेथून जाणाऱ्या एकाने घटनेचे फेसबुक लाइव्ह करत मद मागीतली आणि कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले. सर्व जखमींना वैकुंठपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मनेंद्रगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल हायवे- 43 वर मनेंद्रगडहून अंबिकापूर दरम्यान हा अपघात घडला. सूरजपूरवरून कारमध्ये बसलेले आठ लोक कोतमाकडे निघाले होते. याच वेळी बेलबहराजवळ कार अनियंत्रित झाली आणि एका झाडाला धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती, की त्याच क्षणी कारने पेट घेतला. यावेळी तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने घटनेचे फेसबूक लाइव्ह केले आणि मदत मागीतली.
यानंतर घटनेची सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. मात्र, तोवर दोन जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर दोन्ही मृतदेह आणि जखमींना मनेंद्रगज सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे पोहोचल्यानतंर, जखमींनी प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत मृतांची आणि जखमींनी ओळख पटू शकलेली नाही. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.