मोठी दुर्घटना! सबरीमालाहून परतताना भाविकांची कार 40 फूट खोल दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, दोन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 10:53 AM2022-12-24T10:53:14+5:302022-12-24T10:54:08+5:30
या दुर्घटनेत कारमधील 8 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
चेन्नई -तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक कार अनियंत्रित होऊन 40 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधील 8 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. थेनीचे जिल्हाधिकारी केव्ही मुरलीधरन यांनी यासंदर्भात माहिती दिली.
सबरीमाला मंदिरातून परतत होते भाविक -
जिल्हाधिकारी मुरलीधरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात कुमुली पहाडावर झाला. सर्व भाविक मंदिरातून परतत होते. याच विळी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कारमधील 8 भाविकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. एवढेच नाही, तर हा अपघात एवढा भयानक होता, की सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात जाताना मृत्यू झाला.
Tamil Nadu | Eight devotees died after their car plunged into a 40-foot-deep pit at Kumuli mountain pass in Theni district: KV Muralidharan, District Collector, Theni
— ANI (@ANI) December 24, 2022
(File Pic) pic.twitter.com/NpO1YEGbZ2
मृतांमध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश -
सांगण्यात येते, की पहाडावरील रस्त्याच्या टर्नवर कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे ही दुर्घटना घडली. या अपघातात एक अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे. हे सर्वलोक जिल्यातील अंदीपट्टी येथील रहिवासी आहेत.