लोकसभा निवडणुकीपूर्वीच कर्नाटकात मोठी कारवाई केली आहे. कर्नाटक उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हैसूर ग्रामीण जिल्ह्यातील चामराजनगर लोकसभा मतदारसंघातून ९८.५२ कोटी रुपयांची दारू जप्त केली आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. आयकर विभाग आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमने ३.५३ कोटी रुपयांची रोकडही जप्त केली आहे.
आतिशी यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, उद्या संध्याकाळपर्यंत मागितले उत्तर
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी चामराजनगरमधून ९८.५२ कोटी रुपयांची १.२२ कोटी लिटर बिअर जप्त करण्यात आली. प्राप्तिकर विभागाने बेंगळुरू उत्तर लोकसभा मतदारसंघातून २.२० कोटी रुपये जप्त केले आहेत. कलबुर्गी जिल्ह्यातील गुलबर्गा लोकसभा मतदारसंघात तपासादरम्यान, ३५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आणि उडुपी-चिक्कमंगलुरू मतदारसंघातून ४५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
कर्नाटकमध्ये २६ आणि ७ एप्रिलला दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
कर्नाटकात २८ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान
२०२४ च्या १८व्या लोकसभा निवडणुकीची देशभरात तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा १६ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग सिंधू यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.
यावेळी देशभरात ७ टप्प्यात निवडणुका होणार असून ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा दुसरा टर्म पूर्ण करणार असून सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी २१ राज्यांमधील १०२ जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी १२ राज्यांतील ८८ जागांवर मतदान होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी १३ राज्यांतील ९४ जागांवर मतदान होणार आहे. तर, चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी १० राज्यांतील ९६ जागांवर मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात ८ राज्यांतील ४९ जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे, तर ६व्या टप्प्यात ७ राज्यांतील ५७ जागांवर २५ मे रोजी मतदान होणार आहे आणि ७व्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. १ जून रोजी ८ राज्यांच्या ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर होणार आहे.