वेगाची नशा उतरविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी स्पीड सेंसर कॅमेरे लावलेले आहेत. मुंबई, पुण्यातच नाही तर केरळमध्ये देखील आहेत. याच स्पीड सेन्सिंग कॅमेराने एका महिलेला तिच्या पतीचे लफडे पकडून दिले आहे. तुम्ही कधी विचारही केला नसेल की असेही कधी होऊ शकते. थिरुवअनंतपुरमध्ये एका नवऱ्याने घरी चांगली बेदम मार खाल्ला आहे.
एक तरुण पती त्याच्या स्कूटरवर बसवून प्रेयसीसोबत डबलसीटनं लांब लांब लांब गेला होता. यावेळी तो जरा जास्तच वेगात होता. यामुळे केरळच्या वाहतूक पोलिसांच्या स्पीड कॅमेरामध्ये आला आणि पोलिसांनी सामान्यपणे त्याच्या घरी चलन पाठविले. आता हे चलन तो घरी नसताना त्याच्या बायकोच्या हातात पोस्टमनने ठेवले. मग काय पतीला घरी बोलवून घेतले आणि झाडूने झोड झोड झोडले.
वाहतूक पोलिसांकडे 726 एआय इनेबल्ड कॅमेरे आहेत. या दोघांनीही हेल्मेटही घातले नव्हते. यामुळे वाहतुक पोलिसांनी त्यांचा फोटोच चलनावर छापला आणि तो त्याच्या घरी पाठवून दिला. ती स्कूटर त्याच्या पत्नीच्या नावे होती. तिने हा फोटो पाहिला आणि पत्नीला ती बया कोण असा सवाल केला.
सुरुवातीला त्याने ती महिला वाटसरू होती असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतू, पत्नीने मारायला सुरुवात केली तेव्हा त्यानेही तिला मारहाण केली. तीन वर्षांच्या मुलालाही मारहाण केली. यामुळे हा प्रकार पुन्हा पोलिसांत पोहोचला आणि महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतीला अटक करण्यात आली.