अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्येभाजपाला मोठा धक्का बसला आहे. गुजरातभाजपामधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मनसुख वसावा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसुख वसवा हे भरूच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, लोकसभा सदस्यत्वाचाही आपण राजीनामा देणार असल्याचे वसावा यांनी स्पष्ट केले आहे.भरुच लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे खासदार असलेल्या मनसुखभाई धनजीभाई वसावा यांनी २८ डिसेंबर रोजी गुजरात प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. मात्र मनसुख वासवा यांनी नेमका का राजीनामा दिला आहे. याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का, बड्या नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी
By बाळकृष्ण परब | Published: December 29, 2020 1:49 PM
Mansukh Vasava resigns : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. गुजरात भाजपामधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मनसुख वसावा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
ठळक मुद्दे मनसुख वसवा हे भरूच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात मनसुख वसावा हे गुजरातमधील भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. तसेच आदिवासी समुदायामध्ये त्यांचा मोठा जनाधार आहेमनसुख वासवा यांनी नेमका का राजीनामा दिला आहे. याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही