कोलकाता: विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. चार वर्षांपूर्वी तृणमूलची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले दिग्गज नेते मुकूल रॉय स्वगृही परतले आहेत. तृणमूल भवनमध्ये झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित होत्या. यावेळी मुकूल रॉयदेखील कार्यालयात हजर होते. याबद्दलची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली.बंगालमध्ये दिदींचा खेला! भाजपला मोठा झटका? बडा नेता घरवापसीच्या तयारीत; घडामोडींना वेगविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलला मोठी गळती लागली. तृणमूल सत्ता गमावणार असं वाटू लागल्यानं अनेक आमदारांनी पक्षाला रामराम करत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. भाजपमध्ये झालेल्या इनकमिंगमागे मुकूल रॉय यांचा हात होता. मात्र आता मुकूल रॉयच माघारी फिरल्यानं त्यांच्या गटातले बरेचसे आमदार पुन्हा तृणमूलमध्ये परतू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत बंगालमध्ये भाजपला बरेच धक्के बसण्याची शक्यता आहे.मोदींच्या 'त्या' कॉलनंतरही मुकूल रॉय यांनी सोडला भाजपमुकूल रॉय यांच्या पत्नी आजारी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबद्दल मुकूल रॉय यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉल केला होता. मात्र त्यानंतरही रॉय यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुभ्रांशू रॉयदेखील तृणमूलमध्ये घरवापसी करणार आहे. मुकूल यांच्या पत्नीची ममता बॅनर्जींनी विविध माध्यमांतून चौकशी केली होती. त्यांना योग्य उपचार तातडीनं मिळावेत यामध्ये खुद्द ममता यांनी लक्ष घातल्याचं बोललं जातं.बंगालमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; भाजपच्या गोटात खळबळ, दिदींनी वाढवलं टेन्शनसुवेंदू अधिकारी यांचं वाढत प्रस्थ; मुकूल रॉय अस्वस्थमुकूल रॉय चार वर्षांपूर्वीच भाजपमध्ये गेले. त्यासाठी त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. ममता यांच्यानंतर पक्षात त्यांना पक्षात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान होतं. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं. ममता सरकारमध्ये मंत्री असलेले सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षात त्यांचं प्रस्थ वाढलं. सुवेंदू अधिकारी यांना विरोधी पक्षनेतेपदही देण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच अधिकारी मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यामुळे भाजपमध्ये बाजूला सारण्यात आल्याची भावना रॉय यांच्या मनात होती, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.