कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागले आहे. त्यातच गेल्या काही काळापासून तृणंमूल काँग्रेसमध्ये नाराज असलेले ममता सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. तसेच ते तणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा चर्चाही बंगालच्या राजकारणात रंगल्या आहेत.पश्चिम बंगालच्याराजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. काही दिवसांपूर्वीपासून ते भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आज त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
ममता बॅनर्जींना मोठा धक्का, ज्येष्ठ सहकारी आणि बड्या मंत्राने प. बंगाल सरकारमधून दिला राजीनामा
By बाळकृष्ण परब | Updated: November 27, 2020 14:19 IST
West Bengal - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागले आहे.
ममता बॅनर्जींना मोठा धक्का, ज्येष्ठ सहकारी आणि बड्या मंत्राने प. बंगाल सरकारमधून दिला राजीनामा
ठळक मुद्देममता सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहेशुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होतेपश्चिम बंगालच्या राजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते