भाजपला मोठा धक्का! हिमाचल प्रदेशमध्ये BJP'चे १५ आमदार निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 12:12 PM2024-02-28T12:12:13+5:302024-02-28T12:14:58+5:30
हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीनंतर मोठी घडामोड सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या सभापतींनी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह भाजपच्या १५ आमदारांना निलंबित केले,यानंतर विरोधकांनी मोठा गोंधळ सुरू केला आहे त्यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीनंतर मोठी घडामोड सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या सभापतींनी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह भाजपच्या १५ आमदारांना निलंबित केले,यानंतर विरोधकांनी मोठा गोंधळ सुरू केला आहे त्यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले आहे.
हिमाचल विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान, काँग्रेस सरकारने आपल्या आमदारांचा विश्वास गमावल्याचा दावा भाजपने केला आहे. जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांनी राज्यपालांकडे मतदान विभाजनाची मागणी केली आहे.
दोघांनाही ३४-३४ मते, ईश्वरी चिठ्ठीदेखील सिंघवींच्या नावाची, पण राज्यसभेचा नियम उलटा फिरला... हरले...
भाजपच्या १५ आमदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले असून, त्यात जयराम ठाकूर, विपिन सिंग परमार, विनोद कुमार, जनक राज, बलबीर वर्मा, सुरेंद्र शौरी, इंदर सिंग गांधी, हंसराज, लोकेंद्र कुमार, रणधीर शर्मा, रणवीर सिंग निक्का यांचा समावेश आहे. यानंतर विधानसभेचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.
राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. हिमाचल प्रदेशातील एका जागेवर झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले, तर सत्ताधारी पक्ष काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा क्रॉस व्होटिंगमुळे पराभव झाला. हिमाचल प्रदेशात भाजपला बहुमत नव्हते, पण काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होट केले. याशिवाय तीन अपक्ष आमदारांनीही काँग्रेसला साथ दिली नाही, त्यामुळे काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. राज्यसभेच्या निवडणुकीत दोन उमेदवारांमधील समान मतांमुळे विजयी किंवा पराभूत ठरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, या स्लिपच्या निर्णयातही भाजपचा विजय झाला.
राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. विधानसभेच्या गेटवर मोठा गोंधळ झाला. येथे समर्थकांची मोठी गर्दी जमली असून आता बंडखोर आमदारांचा विरोध केला आहे. विधानसभेच्या बाहेरील बॅरिकेड्स तोडण्यात आले आहेत. याशिवाय या आमदारांच्या वाहनांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून काँग्रेसच्या सहा आमदारांसह एकूण ९ आमदार पंचकुलामध्ये तळ ठोकून होते. बुधवारी सकाळी हे आमदार पंचकुलाच्या ताऊ देवी लाल स्टेडियमवरून हेलिकॉप्टरने शिमल्याला रवाना झाले.