LokSabha Election 2024:लोकसभा निवडणुकीसाठी काहीच महिने शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे विरोधकांची इंडिया आघाडी मजबूत होत आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या एनडीए युतीला मोठा धक्का बसला आहे. दक्षिणेतील मोठा पक्ष असलेल्या अण्णाद्रमुकने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
AIADMK ने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन औपचारिकपणे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मधून बाहेर पडण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर पक्ष मुख्यालयाबाहेर जल्लोषाचे वातावरण आहे. AIADMK समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. भाजप प्रदेशाध्यक्षांनी अण्णादुराई आणि जयललिता यांच्यावर जाणीवपूर्वक टीका केल्याचे AIDMK ने म्हटले आहे.
AIADMK मुख्यालयात पक्षाचे प्रमुख एडप्पादी के पलानीस्वामी (EPS) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत NDA पासून वेगळा होण्याचा निर्णय घेण्यात आला. या चर्चेबद्दल पत्रकारांना माहिती देताना माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते केपी मुनुसामी म्हणाले की, पक्षाने एकमताने एनडीएपासून दूर जाण्याचा आणि पुढील वर्षीच्या निवडणुकीत समविचारी पक्षांची आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नादुराई यांच्यावर सीएन अण्णादुराई आणि जे जयललिता यांची बदनामी केल्याचा आरोप केला. दरम्यान, अनेक दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की, AIDMK प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांच्यावर नाराज आहे. आता या घोषणेनंतर त्यांची नाराजी जाहीर झाली.