आंध्र प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी सोडला पक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 12:53 PM2023-03-13T12:53:17+5:302023-03-13T12:53:45+5:30

Congress: वायएसआर काँग्रेसच्या आव्हानामुळे आधीच दुर्बळ झालेल्या काँग्रेस पक्षाला आंध्र प्रदेशमध्ये मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

Big blow to Congress in Andhra Pradesh, former Chief Minister Kiran Kumar Reddy quits the party | आंध्र प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी सोडला पक्ष 

आंध्र प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी सोडला पक्ष 

googlenewsNext

वायएसआर काँग्रेसच्या आव्हानामुळे आधीच दुर्बळ झालेल्या काँग्रेस पक्षाला आंध्र प्रदेशमध्ये मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान, रेड्डी यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी सांगितले की. ज्या लोकांनी पक्षाकडून सर्व काही मिळवलं आणि आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला संपवलं, त्यांना आता भाजपात गेलं पाहिजे.

किरणकुमार रेड्डी हे अखंड आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री होते. ११ मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणाले की, कृपया माझे हे पत्र काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा म्हणून स्वीकारावे.

किरणकुमार रेड्डी यांनी २०१४ मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी समैक्य आंध्र पार्टी या स्वत:च्या पक्षाची स्थापना केली होती. मात्र २०१८ मध्ये ते काँग्रेसमध्ये परतले होते.

दरम्यान, आता किरण कुमार रेड्डी हे भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आंध्र प्रदेशमध्ये भाजपाची स्थिती यथातथाच आहे. त्यामुळे रेड्डी यांच्या रूपात पक्षाला एक मोठा चेहरा मिळू शकतो.  

Web Title: Big blow to Congress in Andhra Pradesh, former Chief Minister Kiran Kumar Reddy quits the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.