हिमाचलमध्ये काँग्रेसला मोठा झटका, ६ बंडखोर आणि ३ अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 02:11 PM2024-03-23T14:11:16+5:302024-03-23T14:13:01+5:30

लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीच हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Big blow to Congress in Himachal 6 rebels and 3 independent MLAs join BJP | हिमाचलमध्ये काँग्रेसला मोठा झटका, ६ बंडखोर आणि ३ अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

हिमाचलमध्ये काँग्रेसला मोठा झटका, ६ बंडखोर आणि ३ अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

हिमाचल प्रदेशातकाँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे अपात्र ठरलेल्या सहा माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत तीन अपक्ष आमदारांनीही कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतलाय.
 

हिमाचल प्रदेशातील सातत्यानं वाढत असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक माजी आमदार भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशा परिस्थितीत आता काँग्रेसचे सहा माजी आमदार आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपच्या तिकिटावर ते येथून पोटनिवडणूक लढवू शकतात, असंही सांगण्यात येत आहे.  
 


 

व्हिप न पाळल्यानं कारवाई
 

सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र राणा, इंदर दत्त लखनपाल, चैतन्य शर्मा आणि देवेंद्र कुमार भुट्टो या सहा बंडखोर काँग्रेस आमदारांवर व्हिप न पाळल्यानं २९ फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली होती. निवडणूक आयोगानं त्यांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत.  
 

आशिष शर्मा, होशियार सिंग आणि केएल ठाकूर या तीन अपक्ष आमदारांनी शुक्रवारी राजीनामे दिले. त्यांच्या मतदारसंघातही पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. "आम्ही आमचा राजीनामा सुपूर्द केला आहे. आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू आणि पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवू," असं होशियार सिंह यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 

भारतीय जनता पक्षाच्या नऊ आमदारांच्या पाठिंब्यानं राज्यातील एकमेव जागेसाठी राज्यसभेची निवडणूक जिंकल्यानंतर गेल्या महिन्यात मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अडचणीत आलं होतं. परंतु नंतर त्यांच्या सरकारला कोणताही धोका नसल्याची माहिती समोर आली होती.

Web Title: Big blow to Congress in Himachal 6 rebels and 3 independent MLAs join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.