अजित पवारांकडून शिंदे गटाला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती बांधलं घड्याळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 06:22 PM2024-07-29T18:22:08+5:302024-07-29T18:23:07+5:30
Maharashtra Assembly Election 2024: आज अजित पवार गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार नितीन पाटील यांना आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये पक्षांतर आणि पक्षप्रवेशांचं प्रमाण वाढलं आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्ये सध्या जागावाटपावरून एकमेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न प्रत्येक मित्रपक्षाकडून सुरू आहे. दरम्यान, आज अजित पवार गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार नितीन पाटील यांना आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आहेत. नितीन पाटील यांच्या अजित पवार गटातील पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये येत्या काळात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटात अससेले माजी आमदार नितीन पाटील हे कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार असतील, असा दावा केला जात होता. मात्र नितीन पाटील यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केल्याने महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवार गटाला सुटणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहेत. दरम्यान, कन्नड विधानसभा मतदारसंघात उदयसिंह राजपूत हे विद्यमान आमदार आहेत. ते ठाकरे गटामध्ये आहेत. त्यामुळे येथे उदयसिंह राजपूत विरुद्ध नितीन पाटील अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.