Congress Leaders Join BJP: बिग ब्रेकिंग! काँग्रेसचा एक मोठा नेता आज भाजपत करणार प्रवेश, मुख्यालयात हालचाल वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 11:48 IST2021-06-09T11:48:54+5:302021-06-09T11:48:54+5:30
विशेष म्हणजे खुद्द भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार असल्याचे समजते. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजते.

Congress Leaders Join BJP: बिग ब्रेकिंग! काँग्रेसचा एक मोठा नेता आज भाजपत करणार प्रवेश, मुख्यालयात हालचाल वाढली
नवी दिल्ली - देशाच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे एक मोठे नेते भाजपचा भगवा हाती घेणार आहेत. दुपारी एक वाजताच्या सुमारास काँग्रेसचे हे मोठे नेते भाजपत प्रवेश करतील. विशेष म्हणजे खुद्द भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार असल्याचे समजते. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजते. मात्र, अद्याप काँग्रेसच्या या बड्या नेत्याचे नाव समोर आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नेते उत्तर भारतातील एका राज्याशी संबंधित आहेत. (Big Breaking Congress big leaders will join bjp today in delhi name not yet disclosed)
या काँग्रेस नेत्याच्या भाजप प्रवेशावरून राजकीय वर्तीळात चर्चांना उधान आले आहे. पत्रकार आणि सोशल मिडियावर सक्रीय असलेले लोक यावर जबरदस्त चर्चा करत आहेत. सर्वात पहिले या नेत्याचे नाव कोण जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, हे नाव जे कुठले असेल, त्यावरून भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीला एक नवा आयाम दिल्याचीही चर्चा सुरू आहे. कारण काँग्रेसच्या या नेत्याचा संबंध थेट उत्तर भारताशी असल्याचे बोलले जात आहे.
Rajasthan Political Crisis: राजस्थानात पुन्हा राजकीय भूकंप; सचिन पायलट समर्थकांनी आखला प्लॅन, जुलैपर्यंत हायकमांडला मुदत
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. राजकीय दृष्ट्या उत्तर प्रदेश हे देशातील एक अत्यंत महत्वाचे राज्य आहे. भाजप येथील निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आशातच काँग्रेसच्या या मोठ्या नेत्याचा भाजप प्रवेश म्हणजे, काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसच्या या मोठ्या नेत्याचे नाव लवकरच जाहीर होणार आहे. यापार्श्वभूमीवर भाजप मुख्यालयात जोरदार तयारी सुरू आहे. तसेच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा स्वतः आपल्या उपस्थितीत एका दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला प्रवेश देत असतील, तर यावरून हे कुणी काँग्रेसचे मोठे नेते असणार, हे स्पषटच आहे.