गेल्या दोन वर्षापासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संदर्भात आता एक मोठी अपडेट आली आहे. कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात जास्त मृत्यू दिसले आहेत, पण कोरोना व्हायरससंदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर आले आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत आहेत. शनिवारी भारतात कोरोना व्हायरसच्या ७१७१ रुग्णांची नोंद झाली आहे. संपूर्ण आठवडाभरात १० हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना कमी होण्यास सुरुवात झाली आहे आणि आराम फक्त १५-२० दिवसांवर आहे, येत्या २ ते ३ आठवड्यांत, कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने घट होईल, असं तज्ञांनी म्हटले आहे.
आता युरोप आणि अमेरिकेत कोरोना कमी होत आहे, पण दक्षिण आशिया आणि पूर्व भागात अजूनही रुग्ण जास्त आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, फक्त xbb व्हेरियंट आणि BA.2.75 अजूनही जगाच्या बहुतेक भागांमध्ये पसरले आहेत. भारतात वाढणारे रुग्ण देखील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची असतील आणि लवकरच कमी होतील. गेल्या महिन्यापासून भारतात मृत्यूची संख्या थोडी वाढली आहे, पण तज्ञांचे असे मत आहे की अशा रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण आधीच कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आहे.
बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती
आकडेवारीनुसार, गेल्या ५ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत. शनिवारी, २९ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारतात २४ तासात कोरोनाचे ७१७१ रुग्ण नोंदवले आहेत आणि एकूण रुग्णांची संख्या ५१,३१४ झाली आहे. मृतांची संख्या ४० च्या आसपास आहे. २८ एप्रिल रोजी भारतात कोविडची ७५३३ नवीन रुग्ण नोंदवण्यात आली. तर एकूण रुग्णांची संख्या ५३,८५२ होती.
या दिवशी ४४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २७ एप्रिल रोजी कोरोनाचे ९३५५ रुग्ण नोंदवण्यात आली होती, तर एकूण कोविड रुग्णांची संख्या ५७४१० होती आणि मृत्यूची संख्या २६ होती. २६ एप्रिल रोजी ९६२९ नवीन रुग्ण नोंदवण्यात आली. एकूण रुग्णांची संख्या ६१०१३ होती आणि २९ जणांचा मृत्यू झाला होता. २५ एप्रिल ६६६० नवीन रुग्णांची नोंद झाली. तर एकूण रुग्ण ६३३८० होती. या आकड्यांवरून आठवड्यात कोरोनाचे एकूण रुग्णही कमी झाले आहेत असं दिसतंय. आता १५-२० दिवसांत कोरोनापासून मुक्ती मिळू शकेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.