शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

India China Faceoff: भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट; 4 भारतीय, 20 चिनी सैनिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 11:12 AM

India China Face off in Sikkim: सिक्किममध्ये झालेला तणाव कमी करण्यासाठी काल भारत-चीन दरम्यान सुमारे १५ तास बैठक सुरु होती. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर चीनने कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे.

लडाखच्या सीमेवर भारत-चीन दरम्यान तणाव असताना पुन्हा एकदा भारत चीन सैनिकांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे दोन्ही देशांदरम्यान पुन्हा तणाव वाढला आहे. या झटापटीत भारताचे ४ जवान आणि चीनचे २० सैनिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. 

तीन दिवसांपूर्वी सिक्किमच्या के ना कुला पासवर ही झटापट झाल्याचे सांगितले जात आहे. चीनच्या सैनिकांनी एलएसीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चीनच्या बाजुने मोठ्या प्रमाणावर चिनी सैनिक येत होते. त्यांना भारतीय जवानांनी रोखले असता ही झटापट झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच हा तणाव कमी करण्यासाठी काल भारत-चीन दरम्यान सुमारे १५ तास बैठक सुरु होती.

लडाखच्या मोल्डोमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये दोन महिन्यांनंतर अचानक ९ व्या फेरीतील बैठक झाली. या बैठकीतील निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. मात्र, एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठीच ही बैठक झाल्याचे समजते. भारतीय लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. आज तक, टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पुन्हा भारतीय क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न झाल्याने एलएसीवर तणाव वाढला आहे. एकीकडे चीनने लडाखमधून 10000 सैनिकांना हटविल्याचे वृत्त पसरविले आणि दुसरीकडे सिक्किममध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारच्या सुत्रांनुसार चीनने तैनाती कमी केली आहे. मात्र, तरीही भारतीय जवान सीमेवर तैनात आहेत. 

गलवान घाटीमध्ये पहिला हल्ला 15 जूनला चीनच्या सैनिकांनी गलवान घाटीमध्ये पहिला हल्ला केला होता. खिळे चिकटविलेले लोखंडी रॉड, अणुकुचीदार जाळी आदींनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता. भारतीय जवानांनी लगेचच सावध होत चीनच्या सैनिकांना चोख प्रत्यूत्तर दिले होते. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. तर ४० हून अधिक चिनी सैनिक मारले गेले होते. देशातील असंतोष रोखण्यासाठी चीनने अद्याप हे मान्य केलेले नाही.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानsikkimसिक्किमchinaचीन