नवी दिल्ली - अयोध्येतील वादग्रस्त भूमी ही राम जन्मभूमीच असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राम मंदिराच्या बांधणीचा मार्ग मोकळा झाला होता. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दृष्टीन केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला असून, मंदिराच्या बांधणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार ट्र्स्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केली.
राम मंदिराच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे नाव ' श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' असे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मोदींनी आज लोकसभेत दिली. ‘’आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. माझ्या नेतृत्वाखालील सरकारने रामजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्यासाठी तसेच यासंबंधीच्या इतर विषयांवर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार एक व्यापक योजना तयार केली आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीरामजन्मभूमी ट्रस्ट या स्वायत्त ट्रस्टची स्थापना करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.’’असे मोदींनी सांगितले.
‘’भारतातील कणाकणामध्ये आदर्शामध्ये, मर्यादांमध्ये श्रीराम आहेत. श्रीराम आणि अयोध्येच्या ऐतिकासिकतेचा आपणा सर्वाना परिचय आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती आणि वर्तमान तसेच भविष्य काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेऊन अजून एक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अयोध्येध्येमध्ये कायद्यानुसारा अधिकग्रहीत करण्यात आलेली सुमारे ६७ एकर जमीन नव्याने निर्माण करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला हस्तांतरीत करण्यात येणार आहे.’’असेही मोदींनी सांगितले.
उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर
2.75 लाख गावांमध्ये भगवान रामाची प्रतिमा लावणार, मंदिर बांधण्याआधी VHP चा मोठा कार्यक्रम
चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर उभारू; अमित शहांचं मोठं विधान