शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

‘राफेल विमान करारात मोठा भ्रष्टाचार’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 6:09 AM

राफेल विमान करारात मोठा भ्रष्टाचार झाला असून आम्ही सत्तेवर आलो तर हा करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.

नागपूर : राफेल विमान करारात मोठा भ्रष्टाचार झाला असून आम्ही सत्तेवर आलो तर हा करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमात बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या, भारत व फ्रान्स यांच्यात २००८ मध्ये झालेल्या सुरक्षा कराराचा हवाला देऊन राफेल विमान खरेदीचा तपशील देण्यास मोदी सरकारने नकार दिला आहे. अगोदर केंद्रीय रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी प्रत्येक विमान ६७० कोटी रुपयांच्या किमतीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर नेमकी किंमत सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले व अखेर गोपनीयतेचा हवाला देत रक्षामंत्र्यांनी काहीच माहितीच दिली नाही. जो फायदा देशातील ‘हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड’ला मिळायला हवा होता, तो आता फ्रान्समधील ‘डेसॉल्ट’ व ‘रिलायन्स डिफेन्स इंडस्ट्रीज’ला मिळणार आहे. जी कंपनी सायकलदेखील बनवत नाही, तिला विमान बनविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या एकूण करारामुळे बाहेरील कंपन्यांना विविध माध्यमातून एक लाख करोड रुपयांचा फायदा होणार आहे. हा भ्रष्टाचाराचा प्रकार नाही तर काय, असा प्रश्न चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. राफेल प्रकरणाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह असून, संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.‘सोशल मीडिया’च संहारक ठरेल२०१९ मधील निवडणुकींच्या प्रचारासाठी आम्ही केवळ ‘सोशल मीडिया’वर अवलंबून नाही. आम्ही सर्व माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. भाजपाच्या ‘ट्रोल आर्मी’वर त्यांच्याच मंत्री सुषमा स्वराज यांनी टीका केली होती. ज्या ‘सोशल मीडिया’मुळे हे लोक वर आले, तेच माध्यम त्यांच्यासाठी संहारक ठरेल, असे प्रतिपादन प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारnewsबातम्या