Air India News : गेल्या काही काळापासून एअर इंडियामध्ये सुरू असलेल्या जेवणाच्या वादावर कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या कंपनीने म्हटले की, ते यापुढे फ्लाइटमध्ये हिंदू आणि शीखा प्रवाशांना 'हलाल' अन्न देणार नाही. तसेच, मुस्लिम जेवणाला आता स्पेशल जेवण म्हटले जाईल. स्पेशल जेवण हलाल प्रमाणित जेवण असेल. काही काळापूर्वी या जेवणाचे नाव मुस्लिम जेवण ठेवल्याने वाद झाला होता.
एअरलाइनच्या मते, MOML मुस्लिम जेवण स्टिकर लावले जाईल, जेणेकरुन हे स्पेशल मील (SPML) असल्याचे समजेल. हलाल प्रमाणपत्र केवळ सौदी क्षेत्रातील सर्व अन्न हलाल असेल. जेद्दाह, दम्माम, रियाध, मदिना सेक्टरसह हज फ्लाइटवर हलाल प्रमाणपत्र दिले जाईल.
नेमका वाद काय आहे?गेल्या अनेक दिवसांपासून एअर इंडिया विमानातील खाद्यपदार्थांबाबत वादात सापडली होती. याबाबत एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला. 17 जून रोजी काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी एअर इंडियाने धर्माच्या आधारावर खाद्यपदार्थ लेबल केल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. टागोर म्हणाले होते की, एअर इंडियाच्या विमानात हिंदू जेवण आणि मुस्लिम जेवण? यात काय फरक आहे? संघाने एअर इंडिया ताब्यात घेतली आहे का? नागरी विमान वाहतूक मंत्रालय यावर कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले होते.
हलाल आणि झटका मांस म्हणजे काय?इस्लामिक परंपरेनुसार लोक हलाल मांस खातात. यात प्राण्यांची कत्तल करण्यासाठी एक वेगळी प्रक्रिया अवलंबली जाते. यात प्राण्याला थेट न मारता हळुहळू मारले जाते. या उलट झटका मांस म्हणजे, प्राण्याला काही कळण्यापूर्वी थेट मारले जाते. या प्रक्रियेत प्राण्याला वेदना होत नाहीत.