I.N.D.I.A. आघाडीचा मोठा निर्णय, 10 चॅनल्सच्या 14 अँकर्सना केलं बॉयकॉट, शोपासून दूर राहणार; बघा संपूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 08:36 PM2023-09-14T20:36:09+5:302023-09-14T20:39:46+5:30
यासंदर्भात, काँग्रेसने सोशल मिडियावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे, "रोज सायंकाळी 5 वाजता काही टीव्ही चॅनल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. यामुळे, आम्ही द्वेशाच्या बाजारात ग्राहक बनून जाणार नाही," असे INDIA आघाडीने ठरवले आहे.
विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीने 10 न्यूज चॅनल्सच्या एकूण 14 टीव्ही अँकर्सना बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी न्यूज अँकरची यादीही जाहीर केली आहे. यात सुधीर चौधरी, अर्णब गोस्वामी, चित्रा त्रिपाठी, अदिती त्यागी, अमन चोपडा, अमीश देवगन, आनंद नरसिंहा, अशोक श्रीवास्तव, गौरव सावंत, नविका कुमार, प्राची पाराशर, रुबिका लियाकत, शिव अरूर आणि सुशांत सिन्हा या अँकर्सचा समावेश आहे.
यासंदर्भात, काँग्रेसने सोशल मिडियावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे, "रोज सायंकाळी 5 वाजता काही टीव्ही चॅनल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. यामुळे, आम्ही द्वेशाच्या बाजारात ग्राहक बनून जाणार नाही," असे INDIA आघाडीने ठरवले आहे. आमचा उद्देश आहे ‘द्वेश मुक्त भारत’. "जुडेगा भारत, जीतेगा INDIA."
I.N.D.I.A च्या तिसऱ्या बैठकीत तयार करण्यात आल्या 5 समित्या -
गेल्य 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये विरोधी आघाडीची तिसरी बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांसह एकूण 28 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत समन्वय व प्रचार समितीसह एकूण 5 समित्या तयार करण्यात आल्या आहेत.
5 सप्टेंबरला झाली प्रचार समितीची बैठक -
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली 5 सप्टेंबरला दिल्ली येथे I.N.D.I.A च्या कॅम्पेन कमिटीची पहिली बैठक पार पडली. यात मध्य प्रदेशसह 5 राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तयारीसंदर्भात चर्चा जाली. याच बरोबर, 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशणासंदर्भातील रणनीतीवरही चर्चा झाली.