शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

218 Fast Track Court : योगी सरकारचा मोठा निर्णय; लवकरच तयार होणार 218 फास्ट ट्रॅक कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 4:54 PM

218 Fast Track Court : गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत चालली आहे.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक राज्य सरकारांनीही त्याची गंभीर दखल घेण्यास सुरुवात केली आहे. हैदराबाद आणि उन्नाव अत्याचार प्रकरणानंतर पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी नवे 218 फास्ट ट्रॅक कोर्ट बनवण्यास मंजुरी दिलेली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रदेश कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये वाढत्या बलात्कारांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.  दोषींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी, यासाठी योगी सरकार 218 फास्ट ट्रॅक कोर्टांची स्थापना करणार आहे. त्यातील 144 कोर्टांमध्ये नियमित सुनावणी होणार असून, ते बलात्काराच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालणार आहेत. प्रतिकोर्ट 75 लाख रुपये खर्च पकडण्यात आला असून, उत्तर प्रदेशमध्ये लहान मुलांशी जोडलेले 42,379 आणि 25,749 महिलांशी संबंधित प्रकरणांची नोंद आहे.  योगी सरकारनं 'या' निर्णयांना दिली मंजुरी- पूर्वांचल एक्सप्रेस जोडण्याच्या परियोजनेवर बलिया लिंक एक्सप्रेस वे परियोजना विकास व डीपीआरच्या संबंधित प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. - पर्यावरण संरक्षणअंतर्गत 29 झाडांच्या प्रजातींना कापण्यासाठी पहिल्यांदा मंजुरी मिळवणं गरजेचं आहे. एक झाड कापल्यास 10 झाडं लावावी लागणार आहेत. - एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ईएनए)वर 5 टक्के व्हॅट लावण्याच्या प्रस्तावास मंजुरी, राज्य सरकार लावणार टॅक्स- 16 नव्या नगर पंचायतींच्या विकासाला मिळाली मंजुरी

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथhyderabad caseहैदराबाद प्रकरणUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण