Navjot Singh Sidhu: पंजाब काँग्रेसमध्ये मोठी घडामोड! नवज्योत सिंग सिद्धूंचा तडकाफडकी राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 03:31 PM2021-09-28T15:31:32+5:302021-09-28T16:02:09+5:30
Punjab Political crisis: Big Developments in Punjab Congress; Navjot Singh Sidhu resigns as president of Punjab Congress: देशभरात भाजपाचा झंझावात सुरु असताना एकहाती पंजाबची सत्ता खेचून आणणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंगांना (Amarinder Singh) काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून काढून टाकले. यामुळे नाराज झालेले व दिवंगत राजीव गांधी यांचे मित्र असलेले कॅप्टन अमरिंदर यांनी भाजपात प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंडखोरी करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद पटकाविणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंनी (Navjot Singh Sidhu) काही दिवसांतच राजीनामा दिला आहे. अमरिंदर थोड्याच वेळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्या आधीच सिद्धूंनी राजीनामा दिल्याने आतासारे लक्ष अमरिंदर यांच्या भूमिकेकडे लागले आहे. ( Navjot Singh Sidhu resigns as president of Punjab Congress.)
Amrinder Singh: भाजप मुख्यालयात मोठ्या हालचाली; काँग्रेसचा बडा नेता अमित शाहांची भेट घेणार
देशभरात भाजपाचा झंझावात सुरु असताना एकहाती पंजाबची सत्ता खेचून आणणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंगांना (Amarinder Singh) काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून काढून टाकले. भाजपातील वादावरून काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांची विकेट काढली. यामुळे नाराज झालेले व दिवंगत राजीव गांधी यांचे मित्र असलेले कॅप्टन अमरिंदर यांनी भाजपात प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे आज सायंकाळी ४.३० वाजता दिल्लीला येण्याची शक्यता आहे. सुत्रांनुसार कॅप्टन दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी (Amit Shah) चर्चा करणार आहेत. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून भाजपच्या मुख्यालयात मात्र जोरदार हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे.
या घडामोडींनंतर सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये सिद्धू यांनी म्हटले आहे की, मी पंजाबचे भविष्य आणि पंजाब कल्याणाच्या अजेंड्यासोबत समझोता करू शकत नाही. यामुळे मी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देत आहे.