Indigo Flight : गेल्या काही दिवसांपासून विमानात घडलेल्या घटना चर्चेत आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये घडली होती. त्या दिवशी एका प्रवाशाने चक्क विमानाचा आपत्कालीन दरवाजाच उघडला होता. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. हे विमान चेन्नईहून तिरुचिरापल्लीला जात होतं.
प्रवाशाच्या या कृत्यामुळे विमानाला दोन तास उशीर झाला. पण, इंडिगो 6E-7339 फ्लाइटनं तपासणीनंतर लगेचच उड्डाण केलं. त्यावेळेस विमान कंपनीनं प्रवाशाची माफी स्वीकारली, पण कोणतीही कारवाई केली नाही. आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चौकशीचे आदेश दिले आहेत. डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
अधिकाऱ्यानं सांगितले की, ही घटना 10 डिसेंबर रोजी चेन्नईहून तिरुचिरापल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E-7339 मध्ये घडली. एका प्रवाशानं विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि सुरक्षा तपासणीनंतर विमानानं उड्डाण केलं.
यापूर्वीही अशा घटना घडल्याअलीकडेच फ्लाइटमध्ये गैरवर्तन केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरला शंकर मिश्रा नावाच्या व्यक्तीनं एअर इंडियाच्या फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका 70 वर्षीय महिलेवर लघवी केल्याचा आरोप आहे. महिलेनं एअर इंडियाला दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी 4 जानेवारीला तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या एका घटनेत, दोन परदेशी नागरिकांनी गोवा-दिल्ली GoFirst फ्लाइटमध्ये महिला केबिन क्रू सदस्याचा छळ केल्याचा आरोप आहे. 5 जानेवारी रोजी प्रवाशांनी फ्लाइट अटेंडंटवर असभ्य टिप्पण्या केल्या होत्या. विमान कंपनीनं सांगितले होतं की, त्यांनी DGCA ला घटनेची माहिती दिली आणि त्या दोन प्रवाशांना CISF च्या स्वाधीन केलं आहे.