गलवान घाटीमध्ये चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेले होते. या चीनच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या वृत्तीमुळे भारतीयांमध्ये संतापाची लाट आहे. यामुळे बायकॉट चायनाची मोहिम तीव्र झाली असून सरकारनेही चिनी कंपन्यांवर बंदी, कंत्राटे रद्द करण्याची कारवाई केली आहे. यामुळे Made In China ची उत्पादने खरेदी करणे भारतीय टाळू लागले आहेत. यावर काही कंपन्यांनी मोठी शक्कल लढविली आहे.
स्वत:ला भारतीय म्हणवणारी कंपनी Boat या हेडफोन आदी बनविणाऱ्या कंपनीने भारतीयांसोबत घोर फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. चीनमधून ज्या वस्तू आयात केल्या जातात त्यावर मेड इन चायना असे लिहिलेले असते. आता तिथे Made in PRC लिहिले जात आहे. अशाप्रकारे या कंपन्या भारतीयांच्या भावनांशी खेळू लागल्या आहेत.
Made in PRC म्हणजे काय? तुम्हाला आठवत असेल मेड इन युएसए असे अनेक उत्पादनांवर लिहिलेले असायचे. परंतू ते अमेरिकेचे नसून उल्हासनगर असायचे. असाच काहीसा भ्रम या कंपन्या ग्राहकांमध्ये उत्पन्न करू लागल्या आहेत. P.R.C म्हणजे People’s Republic of China होय. मेड इन चायना लिहिन्याची वेगळी पद्धत आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकल्याने या कंपन्यांनी Made in P.R.C लिहिण्यास सुरुवात केली आहे.
यावर एका ग्राहकाने ट्विट करून कंपनीच्या @BoatNirvana या ट्विटर हँडलवर जाब विचारला आहे. भारतीयांना मूर्ख बनविता का? असा सवालही केला आहे. यावर या कंपनीने केलेली सारवासारव हास्यास्पद आहे.
कंपनीने यावर चीन आमच्या व्हॅल्यू चेनचा महत्वाचा भाग आहे. आम्ही 100 टक्के भारतीय आहोत. भारतातच नोकऱ्या देतो आणि दुसऱ्या कंपन्यांसारखे चीनला पैसे पाठवत नाही, असे उत्तर दिले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
'पती खूप प्रेम करतो, श्वास कोंडतोय!', नवविवाहितेला हवाय तलाक; कारणे वाचून व्हाल अवाक्
कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव
शेतकऱ्यांना मोदी सरकारची मोठी मदत; कमी व्याजाच्या 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्डचे वाटप
Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर
मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अॅप लाँच
तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले