जम्मू काश्मीर, पंजाबसारख्या पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या गावांतील घरांवर नेहमीच गोळीबार, उखळी तोफांचा मारा होतो. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले की या नागरिकांना घर सोडून बंकरमध्ये लपावे लागते. तसाच काहीसा प्रकार छत्तीसगडमध्ये घडला आहे. आकाशातून 'गोळीबार' झाल्याने घरांच्या छपरांना एवढी भोके पडली की अक्षरश: चिंधड्या उडाल्याचे भासत आहे.
पेन्ड्रा - मारवाही जिल्ह्यामध्ये शनिवारी दुपारी झालेल्या गारांच्या पावसामध्ये अनेक घरांचे छत कोसळले आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये लोकांच्या घराचे छताला पडलेली छिद्रे, वाहनांच्या काचा फुटलेल्या आणि रिक्षाचे छप्परही फाटल्याचे दिसत आहे. या वादळी पावसामुळे लोकांची कच्ची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आकाशातून मोठमोठे गारांचे गोळे जोरात खाली पडत होते. यामुळे अनेक घरे तुटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
घरांसोबत शेतकऱ्यांचे पिकही उद्ध्वस्त झाले आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की जवळपास ५ मिनिटे आकाशातून गोळे पडत होते. यामुळे लोक घाबरले होते. काही लोकांना दुखापतही झाली आहे. कोरोनाच्या काळातच हे नवे संकट ओढवल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
धनपूर, दर्री, मेंढुका, लालपूर आणि बरसावन गावांतील नागरिकांनी सरकारी शाळांचा आसरा घेतला असून घरे दुरुस्त झाल्यानंतरच हे लोक परत जाणार आहेत. सरकारकडून अद्याप कोणत्याही नुकसानभरपाईची घोषणा झालेली नाही.
अन्य बातम्या वाचा...
कोरोनाची लस चोरण्यासाठी चीनचा खटाटोप; अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला
CoronaVirus धोक्याचे! कोरोना दिवसेंदिवस अवतार बदलतोय; ११ वे रुप खूपच खतरनाक
CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन
एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले