शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पाटण्यात मोठा गोंधळ! अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, एसपीसह अनेक पोलिस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 4:23 PM

सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधलेली 70 घरे पाडण्यासाठी पथक गेले होते, यावेळी स्थानिकांनी दगफेक केली.

पाटणा: बिहारची राजधानी पाटण्यात अतिक्रमण हटवायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये शहराचे एसपी अमरीश राहुल यांच्यासह अनेक पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना शहरातील राजीव नगरमध्ये घडली आहे. या परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी 17 जेसीबी लावण्यात आले आहेत. तसेच, 2000 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

स्थानिकांच्या प्रचंड विरोधानंतरही पोलिसांची कारवाई सुरू आहे. पाटण्याचे जिल्हाधिकाहीदेकील घटनास्थळी पोहोचले आहेत. राजीव नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेपाळी नगरमधील 70 घरांवर कारवाई करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांनी सांगितले की, अतिक्रमण करतेवेळी स्थानिकांनी घराच्या छतावरुन दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. नेपाळी नगरमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

परिस्थिती नियंत्रणात - डीएमपाटणा डीएम चंद्रशेखर सिंह यांनी सांगितले की, अतिक्रमणाची कारवाई सुरुच राहणार आहे. आम्ही कोणत्याही किंमतीत जमीन आमच्या ताब्यात घेऊ. दरम्यान, पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 12 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजवरून उर्वरित हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

नेमकं काय प्रकरण आहे?राजीव नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेपाळी नगर परिसरात बेकायदेशीरपणे बांधलेली 70 घरे पाडण्याचे काम सुरू आहे. ही सर्व 70 घरे गृहनिर्माण मंडळाच्या जमिनीवर बांधण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या सर्व लोकांना यापूर्वीच अनेक नोटिसा पाठवल्या होत्या. त्यांना घर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, अतिक्रमण हटवण्यास तयार न झाल्यामुळे ही कारवाई करावी लागली.

टॅग्स :Biharबिहारpatna-sahib-pcपटना साहिबPoliceपोलिसstone peltingदगडफेक