Rajasthan Politics: राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली! गहलोत दिल्लीत गेले तर सचिन पायलट मुख्यमंत्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 07:06 PM2022-09-18T19:06:47+5:302022-09-18T19:11:58+5:30
गहलोत काही केल्या राज्यातील सत्तेचे दोर आपल्या हातात ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. यामुळे राजस्थानच्या राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे.
राजस्थानमध्ये भाजपाच्या हातून सत्ता हिसकावल्यानंतर काँग्रेसमध्ये धुसफुस सुरुच आहे. सोनिया गांधी यांचे खास असलेल्या अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले, तर राहुल गांधी यांच्या बैठकीतील सचिन पायलट यांना तसे सत्तेतील पॉवरपासून लांबच ठेवण्यात आले. यामुळे मध्यंतरी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पायलट यांनी देखील अयशस्वी प्रयत्न करून पाहिला होता. ही धुसफूस अजून सुरुच असून गहलोत हे काँग्रेस अध्यक्ष बनल्यास पायलट यांना मुख्यमंत्री पद मिळणार का? यावर राजस्थानमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत.
गहलोत काही केल्या राज्यातील सत्तेचे दोर आपल्या हातात ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. यामुळे राजस्थानच्या राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी होकार दिला नाही तर गेहलोत अध्यक्ष होणार आहेत. परंतू, राजस्थानचे मुख्यमंत्री पद पायलटांच्या हातात जाऊ नयेत य़ासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष असलेले सी पी जोशी यांना मुख्यमंत्री पदासाठी ते पुढे करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी पायलट गटही सक्रीय झाला आहे. गेहलोत यांना पायलट हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले नको आहे. यामुळे हाय़कमांडनेही आपला विश्वासू आणि वाद टाळण्यासाठी असा नेता निवडण्याचा विचार सुरु केला आहे. सीपी जोशी हे अनुभवी असल्याने तसेच पक्षतही चांगले वजन असल्याने त्यांचेच नाव पुढे केले जाणार असल्याची चर्चा आहे. सीएम गेहलोत आणि सीपी जोशी दोघेही आज जोधपूरमध्ये एकत्र होते. राजस्थानच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांचे पूत्र वैभव गेहलोत यांना पुढे आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.