नोटाबंदीनंतर सुरु झालेले व आजतागायत मोफत असलेले युपीआय ट्रान्झेक्शन आता महागात पडणार आहे. कारण नवीन वर्ष म्हणजेच १ जानेवारीपासून UPI पेमेंटवर शुल्क आकारले जाणार आहे. थर्ड पार्टी अॅपद्वारे जर कोणी युपीआय ट्रान्झेक्शन करणार असेल तर त्याला जादा चार्ज द्यावा लागणार आहे.
नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) ने हा अतिरिक्त चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर NPCI ने थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर गुगल पे, अॅमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे. मात्र या नियमाचा परिणाम पेटीएमच्या ग्राहकांवर होणार नाही.
विदेशींवर भारतीय अॅप पडले भारी! PhonePe ने Google Pay ला मागे टाकले
युपीआय पैसे ट्रान्सफर करताना लावला जाणारा हा चार्ज पेटीएमला लागणार नाही. मात्र, फोनपे (Phonepe), गूगलपे (Google Pay), अॅमेझॉन पे (Amazon Pay) या पेमेंट अॅपवरून पैसे ट्रान्सफर केल्यास हे शुल्क आकारले जाणार आहे.
या निर्णयाबाबत एनपीसीआयने सांगितले की, थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सवर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनपीसीआये हा निर्णय भविष्यात कुठल्याही थर्ड पार्टी अॅपची एकाधिकारशाही रोखण्यासाठी आणि त्याला आकाराच्या मनाने मिळणारे विशेष फायदे थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. एसपीसीआयच्या या निर्णयामुळे आता UPI ट्रांझॅक्शनमध्ये आता कुठल्याही पेंमेंट अॅपची एकाधिकारशाही राहणार नाही. ३० टक्के कॅप निर्धारित करण्यात आल्याने आता गुगल पे, अॅमेझॉन पे, फोनपे सारख्या कंपन्या यूपीआयअंतर्गत होणाऱ्या एकूण ट्रान्झॅक्शनमध्ये कमाल ३० टक्के ट्रान्झॅक्शनचीच तरतूद करू शकतील.
युपीआय म्हणजे काय? यूनिफाइड पेमेंट इंटरफेस/UPI एक रियल टाइम पेमेंट सिस्टिम आहे. ती मोबाईल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पैसे अकाऊंटमध्ये त्वरित ट्रान्सफर करू शकते. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बँकेच्या अकाऊंटमधून त्वरित ट्रान्सफर करू शकता. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बँक अकाऊंटला अनेक यूपीआय अॅपशी लिंक करू शकता. तर अनेक बँक अकाऊंटना एका यूपीआय अॅपच्या माध्यमातून नियंत्रित करू शकता.